तीन दिवसांपासून पुरात अडलेल्या महिनाभराच्या बाळाला वाचवण्यात एनडीआरएफला यश

| Updated on: Aug 10, 2019 | 11:28 PM

एनडीआरएफच्या टीमने लाखो लोकांना सुरक्षितपणे पुरातून बाहेर काढले आहे. याच महापुरात तीन दिवसांपासून अडकेलेल्या एका महिन्याच्या बाळाला वाचवण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे.

तीन दिवसांपासून पुरात अडलेल्या महिनाभराच्या बाळाला वाचवण्यात एनडीआरएफला यश
Follow us on

सांगली : सांगलीत पावसाने विश्रांती घेतलेली असेली तरी पूरस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अजूनही पुरात अनेकजण अडकलेले आहेत. एनडीआरएफ, पोलीस, एसडीआरएफ, नौसेना, लष्कर, वायूसेना हे सर्वच युद्धपातळीवर बचावकार्य चालवत आहेत. आतापर्यंत एनडीआरएफच्या टीमने लाखो लोकांना सुरक्षितपणे पुरातून बाहेर काढले आहे. याच महापुरात तीन दिवसांपासून अडकेलेल्या एका महिन्याच्या बाळाला वाचवण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राजेश मोहत छत्री यांच्यासह त्याचं कुटुंब महापुराच्या पाण्यात अडकून होते. राजेश मोहत छत्री यांच्यासोबत त्यांची पत्नी, एक मुलगा, मुलगी आणि एक महिन्याभराची मुलगी हे देखील महापुरात अडकले होते. कोल्हापूर रोड येथील आकाशवाणी शेजारी परिसरात हे कुटुंब राहतं होतं. सांगलीत पूरस्थितीत कुठे आसरा घ्यावा हे कदाचित या कुटुंबाला कळालं नाही. पाण्याची पातळी वाढत असल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळ बाजुच्या इमरातीचा आधार घेतला. त्यांच्या परिसरात तब्बल दहा फुटांपर्यंत पाणी भरलं होतं.

हे कुटुंब तिथे तीन दिवस अडकून होतं. यावेळी त्यांच्याकडे नाही अन्न होतं, नाही प्यायला पाणी. तीन दिवस हे कुटुंब त्या एका महिन्याच्या बाळासह उपाशी मदतीच्या आशेत होते. आज अखेर एनडीआरएफची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना सुखरुप सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं. राजेश मोहत हे नोकरीसाठी नेपाळवरुन सांगलीला आले होते.

एनडीआरएफने राजेश मोहत आणि त्यांच्या एक महिन्याच्या मुलीसह संपूर्ण कुटुंबाला वाचवलं. यासाठी राजेश मोहत यांनी एनडीआरएफचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या :

महाजनांनी सेल्फी काढला नाही, धान्याच्या पाकिटावर महाराष्ट्र सरकारचेच स्टिकर : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या पायालाही पाणी लागलं नाही, पूरग्रस्तांचा संताप, फडणवीसांविरोधात घोषणा

पाऊस किती पडणार हे सांगण्याइतपत आपलं विज्ञान प्रगत नाही : मुख्यमंत्री

बापाच्या घरातून देताय का?, फूड पाकिटावरील भाजप नेत्यांच्या फोटोवर राजू शेट्टींचा संताप