CORONA | मिरारोडच्या रिक्षात ऑटोमॅटिक सॅनिटायझेशन, प्रत्येक प्रवाशाला निर्जंतुक सीट

| Updated on: Jul 31, 2020 | 6:19 PM

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मिरारोडमधील एका ऑटो रिक्षा चालकाने चक्क सॅनिटायझर रिक्षा तयार केली (Sanitizer Rickshaw At Mira Road) आहे.

CORONA | मिरारोडच्या रिक्षात ऑटोमॅटिक सॅनिटायझेशन, प्रत्येक प्रवाशाला निर्जंतुक सीट
Follow us on

मिरा रोड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा यासारख्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना नागरिक घाबरत आहे. या पार्श्वभूमीवर मिरारोडमधील एका ऑटो रिक्षा चालकाने चक्क सॅनिटायझर रिक्षा तयार केली आहे. ज्यामुळे चालकासह प्रवाशीही सुरक्षित राहणार आहेत. (Sanitizer Rickshaw At Mira Road)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. यामुळे सार्वजनिक वाहनातून प्रवास करणाऱ्यांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अनेक जण विविध कल्पना लढवत आहेत. त्यातच चक्क मिरारोडमधील एका रिक्षा चालकाने सॅनिटायझर ऑटोरिक्षा तयार केली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

सूरज तेंडूलकर आणि विकास निकम या दोन युवकांनी या रिक्षासाठी खास सॅनिटायझर मशीन बनवले आहे. यानुसार या रिक्षात प्रवाशी बसण्यापूर्वी आणि उतरल्यानंतर सॅनिटायझरद्वारे रिक्षा सॅनिटाईज होते. त्यामुळे रिक्षा चालकासह प्रवाशीही या रिक्षातून सुरक्षित प्रवास करु शकतात.

रिक्षा चालकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह हा रिक्षाद्वारेच होत असतो. दिवसभर रिक्षा चालवताना त्यांच्या संबंध अनेक प्रवाशांसोबत येतो. त्यामुळे अनेक प्रवाशी रिक्षात बसण्यापूर्वी शंका उपस्थितीत करतात. मात्र रिक्षा चालकाच्या या युक्तीमुळे प्रवाशांच्या मनातील भीती कमी होण्यास मदत होईल, असे बोललं जात आहे.

या सॅनिटायझरयुक्त रिक्षामुळे चालकांसह प्रवाशांमध्येही कोरोनाची भीती कमी होईल. तसेच ते दोघेही सुरक्षित राहतील, असेही सांगितले जात आहे. (Sanitizer Rickshaw At Mira Road)

संबंधित बातम्या : 

कोरोना केअर सेंटरला नेण्यास विरोध, महाबळेश्वरमध्ये आरोग्य पथकाच्या गाड्यांवर दगडफेक

नागपूरच्या लोकप्रतिनिधींना ‘इगो’ची लागण, कोरोनाकाळातही राजकारण