कोरोना केअर सेंटरला नेण्यास विरोध, महाबळेश्वरमध्ये आरोग्य पथकाच्या गाड्यांवर दगडफेक

रांजनवाडी गावात कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी न्यायला आलेल्या आरोग्य पथकाच्या गाड्यांवर जमावाने दगडफेक केल्याचा आरोप आहे

कोरोना केअर सेंटरला नेण्यास विरोध, महाबळेश्वरमध्ये आरोग्य पथकाच्या गाड्यांवर दगडफेक

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना महाबळेश्वर तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रांजनवाडी गावात कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी न्यायला आलेल्या आरोग्य पथकाच्या गाड्यांवर काल रात्री जमावाने दगडफेक केल्याचा आरोप आहे. (Satara Mahabaleshwar mob allegedly stone pelting on Corona Center employees)

जमावाने आरोग्य कर्मचार्‍यांना परतवून लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. टोळक्याच्या दगडफेकीत तीन गाड्यांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी नगरपालिका कर्मचारी आणि आरोग्य सेवक काल रात्री गेले होते. मात्र आमच्यावर घरातच उपचार करा असा तगादा लावून नागरिकांनी आलेल्या कर्मचार्‍यांना विरोध केला.

हेही वाचा : खासगी प्रयोगशाळांनी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल परस्पर देऊ नये : उद्धव ठाकरे

संतप्त जमावाने कर्मचार्‍यांवरच दगडफेक केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे रात्री परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र स्थानिक नागरिकांनी दगडफेकीचे आरोप फेटाळले आहेत.

(Satara Mahabaleshwar mob allegedly stone pelting on Corona Center employees)

Published On - 9:40 am, Fri, 31 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI