संजय दत्तला विश्रांतीचा सल्ला, ‘केजीएफ 2’चे अ‍ॅक्शन सीन्स बदलण्याची शक्यता

| Updated on: Oct 24, 2020 | 4:10 PM

बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात संजय दत्त (Sanjay Dutt) याने फुप्फुसाच्या कर्करोगावर (Lung Cancer) नुकताच मात केली आहे. संजय दत्त लवकरच पृथ्वीराज आणि केजीएफ 2 च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

संजय दत्तला विश्रांतीचा सल्ला, केजीएफ 2चे अ‍ॅक्शन सीन्स बदलण्याची शक्यता
अभिनेता संजय दत्त कर्करोगाच्या बातमीनंतर ऑगस्टपासून चर्चेत आला आहे. त्याला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं. आता संजूबाबाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या नव्या लूकची झलक चाहत्यांना दिली आहे.
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात संजय दत्त (Sanjay Dutt) याने फुप्फुसाच्या कर्करोगावर (Lung Cancer) नुकताच मात केली आहे. संजय दत्त लवकरच पृथ्वीराज आणि केजीएफ 2 च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. मात्र, संजय दत्तच्या आगामी या दोन्ही चित्रपटात बरेच बदल केले जातील. यापूर्वी दोन्ही चित्रपटांमध्ये संजय दत्तचे जोरदार अ‍ॅक्शन सीन्स होते. ते अ‍ॅक्शन सीन्स करण्यासाठी त्याचा फिटनेस चांगला असणे आवश्यक होते. परंतु संजय दत्तची तब्येत अजून इतकी चांगली नाही की,तो चित्रपटात अ‍ॅक्शन सीन्स करू शकेल.(Sanjay Dutt Advised To Rest Possibitity Change Action Scenes Kgf2)
केजीएफ 2 व्यतिरिक्त संजय दत्त अक्षय कुमार सोबत पृथ्वीराज चित्रपटात दिसणार आहे. पृथ्वीराज चित्रपटामध्ये त्याला घोड्यावरुन अ‍ॅक्शन सीन्स करायचे आहे. पण आता त्याची प्रकृती पाहता चित्रपटात काही बदल करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच फुप्फुसाच्या कर्करोगावर संजय दत्तने विजय मिळवला आहे. संजय दत्त याबद्दल सोशल मीडियावर लिहितो की, काही आठवडे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. परंतु असे म्हणतात की, देव सर्वात शक्तिशाली लढवय्यांना सर्वात कठीण लढाई देतो.

आणि आज माझ्या मुलाच्या वाढदिवशी, मी जिंकल्यानंतर या लढाईतून बाहेर पडताना मला आनंद झाला आहे.आणि मला सर्वोत्कृष्ट भेट देण्यास सक्षम केले आहे. यावर्षीचा ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेत गेला होता. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तचा पीटीई रिपोर्ट आला होता. त्यानुसार संजय दत्त कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला असल्याचे म्हटले होते.

कोरोनाच्या संशयामुळे लीलावती रुग्णालयात होता दाखल
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे नंतर त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने अवघ्या दोनच दिवसात संजयला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रुग्णालयात दाखल असतानाही संजय दत्तने ट्वीट करत त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली होती.
“मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रकृती ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे,आणि माझा कोव्हिड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांची मदत आणि शुश्रुषेमुळे मी एक-दोन दिवसांत घरी येईन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद”, असे ट्वीट संजय दत्तने केले होते.

संबंधित बातम्या : 

परमेश्वर परीक्षा घेतोय, पण आम्ही जिंकू, संजय दत्तची पत्नी मान्यताची भावनिक प्रतिक्रिया

‘माझ्यासाठी प्रार्थना करा’, अभिनेता संजय दत्तचं आवाहन

(Sanjay Dutt Advised To Rest Possibitity Change Action Scenes Kgf2)