AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्यासाठी प्रार्थना करा’, अभिनेता संजय दत्तचं आवाहन

अभिनेता संजय दत्त सोमवारी (18 ऑगस्ट) कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला (Sanjay Dutt says pray for me while leaving for hospital)

'माझ्यासाठी प्रार्थना करा', अभिनेता संजय दत्तचं आवाहन
| Updated on: Aug 19, 2020 | 12:41 AM
Share

मुंबई : अभिनेता संजय दत्त सोमवारी (18 ऑगस्ट) कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला. संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसोबत रुग्णालयात जाताना दिसला. घराबाहेर पडल्यानंतर तिथे उपस्थित छायाचित्रकारांना त्याने हात दिला. त्यानंतर ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’, असं संजय दत्त म्हणाला (Sanjay Dutt says pray for me while leaving for hospital) .

संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुप्फुसाचा कर्करोग झाला आहे. त्यामुळे त्याला उपचारांसाठी नियमित रुग्णालयात जावं लागणार आहे. संजय दत्त सोमवारी कोकीलाबेन रुग्णालयात गेला. याआधी संजय दत्तने लीलावती रुग्णालयात कीमोथेरेपी आधी केल्या जाणाऱ्या सर्व टेस्ट केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे (Sanjay Dutt says pray for me while leaving for hospital).

संजय दत्तला कोरोनाची लागण झाल्याची माहिती 11 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा समोर आली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी संजयची पत्नी मान्यताने भावनिक प्रतिक्रिया दिली होती. त्याचबरोबर संजय दत्तनेदेखील ट्विटरवर आपण काही दिवसांसाठी ब्रेक घेत असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती.

मान्यता दत्त काय म्हणाली होती?

“मी सर्व हितचिंतकांप्रती आभार व्यक्त करते, ज्यांनी संजयच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला प्रचंड शक्ती आणि आशीर्वादाची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून आमचं कुटुंब अनेक संकटांमधून गेलं. मला विश्वास आहे की, ही वेळ, हा प्रसंगही निघून जाईल. संजूच्या सर्व चाहत्यांना माझी विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्हाला फक्त तुमचं प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे”, असं मान्यता दत्त म्हणाली होती.

“संजू नेहमी लढवय्या राहीला आणि आमचं कुटुंबही. परमेश्वर पुन्हा आमची परीक्षा घेतोय. परमेश्वराला बघायचंय की, आम्ही कसं या संकटाचा सामना करतो. आम्हाला फक्त तुमची प्रार्थना आणि आशीर्वादाची गरज आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही जिंकू, जसं आम्ही नेहमीप्रमाणे जिंकत आलो आहोत, अगदी तसंच जिंकू. चला, या संधीला प्रकाशमान करु आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी वापर करु”, असं मान्यता म्हणाली होती (Maanayata Dutt statement on husband Sanjay Dutt health).

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्तला 8 ऑगस्ट रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने अवघ्या दोनच दिवसात (10 ऑगस्ट) संजयला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयात दाखल असतानाही संजय दत्तने ट्वीट करत त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली होती.

“मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रकृती ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे आणि माझा कोव्हिड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांची मदत आणि शुश्रुषेमुळे मी एक-दोन दिवसांत घरी येईन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद”, असे ट्वीट संजय दत्तने रुग्णालयात दाखल असताना (8 ऑगस्ट) केले होते.

दरम्यान, लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 11 ऑगस्ट रोजी संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. “मित्रांनो काही वैद्यकीय उपचारांसाठी मी नेहमीच्या कामातून ब्रेक घेत आहे. माझ्यासोबत माझे कुटुंबिय आणि मित्र परिवार आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवून चिंतेत पडू नका, एवढेच माझे हितचिंतकांना सांगणे आहे. तुमच्या प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परतेन”, असे या पोस्टमध्ये संजय दत्तने म्हटलं होते (Sanjay Dutt Diagnosed With Lung Cancer).

संबंधित बातम्या :

संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

परमेश्वर परीक्षा घेतोय, पण आम्ही जिंकू, संजय दत्तची पत्नी मान्यताची भावनिक प्रतिक्रिया

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.