AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay  Dutt | संजय दत्तचा उपचारांना चांगला प्रतिसाद, ‘कर्करोग मुक्त’ झाल्याचा दावा!

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, संजय दत्त पूर्णपणे बरा झाल्याची माहिती त्याच्या एका निकटवर्तीयाने दिली आहे.

Sanjay  Dutt | संजय दत्तचा उपचारांना चांगला प्रतिसाद, ‘कर्करोग मुक्त’ झाल्याचा दावा!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 20, 2020 | 11:47 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात संजय दत्त (Sanjay Dutt) यांने फुप्फुसाच्या कर्करोगावर (Lung Cancer) मात केल्याचे कळते आहे. काहीच दिवसांपूर्वी संजय दत्तचे फोटो व्हायरल झाले होते. यात त्याची प्रकृती ढासळलेली दिसल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र, पीटीआयच्या रिपोर्टनुसार, संजय दत्त पूर्णपणे बरा झाल्याची माहिती त्याच्या एका निकटवर्तीयाने दिली आहे. (Sanjay Dutt recovered after treatment for lung cancer)

यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेत गेला होता. गेल्या आठवड्यात त्याचा पीटीई रिपोर्ट आला असून, त्यानुसार संजय दत्त कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्याच्या एका जवळच्या व्यक्तीने पीटीआयला ही माहिती दिली आहे

त्यांनी सांगितले की, ‘जेव्हा संजय दत्त आजारी आहे ही बातमी समोर आली तेव्हा सगळ्यानांच शॉक बसला होता. त्यातही त्याला कर्करोग झाल्याने तो आता केवळ सहा महिनेच जगणार असल्याच्या अफवादेखील पसरल्या होत्या. मात्र, या अफवांना बळी न पडता त्याच्या सगळ्या चाहत्यांनी प्राथर्ना केली आणि त्यांच्या प्रार्थनांना यश आले आहे. उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्याने, तो या सगळ्यातून लवकर बाहेर पडला आहे.’(Sanjay Dutt recovered after treatment for lung cancer)

लवकरच चित्रीकरणावर परतणार

कर्करोगावर मात केलेला संजय दत्त लवकरच ‘केजीएफ 2’ च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. चित्रीकरणाआधी संजय दत्त हेअरस्टाईलसाठी सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट आलीम हकीम याच्याकडे गेला होता. आलीम हकीमने संजय दत्तसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात संजूबाबाने सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या संशयामुळे लीलावती रुग्णालयात होता दाखल

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्तला 8 ऑगस्ट रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे नंतर त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने अवघ्या दोनच दिवसात संजयला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रुग्णालयात दाखल असतानाही संजय दत्तने ट्वीट करत त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली होती. (Sanjay Dutt recovered after treatment for lung cancer)

“मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रकृती ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे आणि माझा कोव्हिड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांची मदत आणि शुश्रुषेमुळे मी एक-दोन दिवसांत घरी येईन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद”, असे ट्वीट संजय दत्तने केले होते. यानंतर तपासणी दरम्यान त्याला फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते.

संजय दत्तचा ‘पानिपत’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता तो ‘सडक 2’, ‘शमशेरा’, ‘भुज’, ‘केजीएफ’, ‘पृथ्वीराज आणि तोरबाज’ अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कोरोनामुळे काही चित्रपटांच्या चित्रीकरणाला ब्रेक लागला होता.

(Sanjay Dutt recovered after treatment for lung cancer)

संबंधित बातम्या :

संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

परमेश्वर परीक्षा घेतोय, पण आम्ही जिंकू, संजय दत्तची पत्नी मान्यताची भावनिक प्रतिक्रिया

Follow Us
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर... पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?