AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकोबांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान, सोन्या आणि राजाची निवड कशी झाली?

संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान बाणेर येथील शेतकरी बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या आणि राजा या जोडीला मिळाला आहे. 

तुकोबांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान, सोन्या आणि राजाची निवड कशी झाली?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jun 14, 2019 | 7:16 PM
Share

पुणे : संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान बाणेर येथील शेतकरी बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या आणि राजा या जोडीला मिळाला आहे.  संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्याची तयारी श्रीक्षेत्र देहूमध्ये मोठ्या उत्साहात सुरु आहे. येत्या 24 जूनला पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखीचा रथ ओढण्याचा मान सोन्या आणि राजाला मिळाला आहे. सोन्या आणि राजा तुकाराम महाराजांचा पालखी रथ देहू ते पंढरपूर असा ओढणार आहेत.

यंदा पालखी रथ ओढण्यासाठी संस्थानकडे 14 अर्ज आले होते. त्यापैकी 7 बैल मालकांची जनावरे ही सुदृढ शरीरयष्टीची होती. त्यामुळे तुकाराम महाराज संस्थानांच्या निवड समितीकडून, बैलांची निवड करणे अवघड झाले होते. यासाठीच सातही बैल मालकांच्या नावाची चिठ्ठी उडवून रथासाठी बैलांची निवड करण्यात आली. यावेळी पहिला मान बाणेर येथील शेतकरी बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या आणि राजा या जोडीला मिळाला. तर दुसऱ्या बैलजोडीचा मान रविंद्र बाळासाहेब कोंढरे (अंबेगाव नऱ्हे) यांच्या बैलजोडीला मिळाला.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...