
सातारा : साताऱ्यामध्ये कार दरीत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील पाचगणी जवळच्या पसरणी घाटात आज सकाळी 11 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे पाचगणीवरून वाईकडे जाणारी स्विफ्ट कार 400 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Satara accident Swift car crashed into 400 foot Valley woman died two injured)
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली असून या गाडीतील आणखी दोन जखमींना दरीतून बाहेर काढलं असून तात्काळ उपचारासाठी वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर अद्याप जखमींची ओळख पटली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
….म्हणून पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत : विनायक मेटे
प्राथमिक माहितीनुसार, जखमी हे मुंबई इथले रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी गाडीला वर खेचण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघात नेमका कसा झाला याचाही पोलीस शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर भीषण अपघात झाल्यानंतर महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच जखमींनाही मोठा धक्का बसला असल्याचं सांगण्यात येत आहे.
‘प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का?’
Beed | बीडमध्ये कचऱ्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, जिल्हाध्यक्षानी JCBची केली तोडफोडhttps://t.co/VtfnbYePHb
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2020
(Satara accident Swift car crashed into 400 foot Valley woman died two injured)