पीकअपच्या भीषण अपघातात दुचाकीस्वारांनी दिला मृत्यूला चकवा, थरकाप उडवणारं CCTV फूटेज

जालना औरंगाबाद रोडवर गाढे जळगाव फाट्यावर बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास विचित्र अपघात पाहायला मिळाला.

पीकअपच्या भीषण अपघातात दुचाकीस्वारांनी दिला मृत्यूला चकवा, थरकाप उडवणारं CCTV फूटेज
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 11:34 AM

जालना : भीषण अपघाताचे अनेक फूटेज आपण पाहिले असतील. असंच एक काळजाचा ठोका चुकवणारे अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. जालना औरंगाबाद रोडवर गाढे जळगाव फाट्यावर बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास विचित्र अपघात पाहायला मिळाला. यामध्ये पीकअपचा अपघात होताना दुचाकीस्वार अगदी थोडक्यात वाचले आहेत.

औरंगाबादवरून जालन्याकडे जाणारा पीकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर जाऊन आदळला. दरम्यान समोरून येणारे एका दुचाकीवरील दोघेजण या अपघातात थोडक्यात बचावले आहेत. हे दृश्य CCTV मध्ये कैद झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सीसीटीव्ही व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे पीकअप हा डिव्हायडरच्या बाजूने कलंडताना बाजूने दुचाकी गेली. पण दुचाकीस्वाराने वेळीच गाडीचा वेग वाढवून पुढे गेल्याने ते थोडक्यात बचावले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्याच्या मधे असलेला अपघाती पीकअप बाजूला करण्याचं काम सुरू आहे. तर काही वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असल्याचंही सांगण्यात आलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.