AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

….म्हणून पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत : विनायक मेटे

पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत असा विश्वास शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायम मेटे यांनी व्यक्त केला आहे.

....म्हणून पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत : विनायक मेटे
| Edited By: | Updated on: Oct 24, 2020 | 1:18 PM
Share

औरंगाबाद : एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर पंकजा मुंडेदेखील पक्ष सोडतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशात पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत असा विश्वास शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायम मेटे यांनी व्यक्त केला आहे. (Pankaja Munde will not leave BJP said by vinayak Mete) खरंतर खडसेंप्रमाणे, पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

पण यावर पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, ‘पंकजा मुंडे या त्यांच्या प्रदेश अध्यक्षांना कितीही वाईट बोलल्या. धिक्कार केला, काहीही बोलल्या, त्यांच्या कार्यक्रमाला नाही गेल्या. वाईट कमेंट केल्या, तरी हे सगळं फक्त भाजप सहन करतो. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून जातील असं मला वाटत नाही.’ असं विधान विनायक मेटे यांनी केलं आहे.

‘प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का?’

तर एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेशा देण्यात शरद पवार बिझी असल्यामुळे त्यांना मराठा आरक्षणकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल असं म्हणत विनायक मेटे यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.

मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका मराठा आरक्षण प्रकरणी आघाडी सरकारने समाजाला सैरभैर केलं आहे. बैठकीत सरळ-सरळ चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण प्रकरणी काही घडलं तर त्याला फक्त अशोक चव्हाण जबाबदार असतील. अशोक चव्हाण हे फक्त खुर्ची उबवण्याचं काम करत आहेत, अशी गंभीर टीकाही यावेळी मेटेंनी केली.

रात गयी, बात गयी, खडसेंबाबतच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची कमेंट

(Pankaja Munde will not leave BJP said by vinayak Mete)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.