फी न भरल्याने परीक्षेला बसू देण्यास नकार; कल्याणच्या ‘प्रतिष्ठित’ शाळेतील प्रकार

| Updated on: Oct 05, 2020 | 10:15 PM

फी न भरल्यामुळे विद्यार्थांना परीक्षेला बसू न देण्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला. (school in Kalyan Denied the students to give exams because of fees)

फी न भरल्याने परीक्षेला बसू देण्यास नकार; कल्याणच्या प्रतिष्ठित शाळेतील प्रकार
परीक्षा
Follow us on

मुंबई : फी न भरल्यामुळे विद्यार्थांना परीक्षेला बसू न देण्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला. आधी फी भरा आणि नंतरच परीक्षेला बसा; अशी अडेलतट्टू भूमिका शाळा व्यवस्थापनाने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. शाळेत  इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेताना हा प्रकार घडला. (school in Kalyan Denied the students to give exams because of fees)

कल्याणमधील एका प्रतिष्ठीत शाळेत ऑनलाईन पद्धतीने शिकवणे सुरु केले आहे. नियोजित वेळेनुसार शाळेना विद्यार्थ्यांची परीक्षाही ऑनलाईनच घेण्याचे नियोजन शाळेने केले. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लॉगीन आयडी देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात लॉगीन करुन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना फी भरण्याचे नोटीफिकेशन येत होते. फी भरली तरच परीक्षा देता येईल; अशा सूचना येत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. हा प्रकार समजल्यानंतर पालकांनी शाळेत धाव घेतली. व्यवस्थापनाला जाब विचारण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांना ठोस उत्तर मिळाले नाही.

स्थानिक नगरसेवकाची मध्यस्थी

मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने पालकांनी स्थानिक नगरसेवकाकडे धाव घेतली. नगरसेवकांनी शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मध्यस्थी करुन या संदर्भात बैठकीचे नियोजन केले आहे. या बैठकीत ठोस उपाय निघण्याची अपेक्षा आहे. टीव्ही 9 मराठीने घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण शाळा व्यवस्थापनाने समाधानकारक उत्तर दिले नाही. मिळालेल्या माहितीनुसार शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्याची तयारी दर्शविली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने शिकण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिकतही आहेत. पण फी भरली नसल्यामुळे अशा पद्धतीने अडवणूक होत असल्याचे समोर आल्याने ऑनलाईन शिक्षणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनांनी आपल्या धोरणात लवचिकता दाखवावी अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

ऑनलाईन शिक्षणाच्या अवकळा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची रेंजसाठी शोधाशोध

Digital Eyestrain | ऑनलाईन अभ्यासामुळे डोळ्यांवर ताण, मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढल्या!

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास

(school in Kalyan Denied the students to give exams because of fees)