ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने एका शाळकरी विद्यार्थिनीने गळफास आत्महत्या केली आहे. (SSC Girl Suicide Due to not have Mobile for Online Education)

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास

सातारा : कोरोनामुळे सरकारने ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने एका शाळकरी विद्यार्थिनीने गळफास आत्महत्या केली आहे. कराड तालुक्यातील ओंड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (SSC Girl Suicide Due to not have  Mobile for Online Education)

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ती दहावीत शिक्षण घेत होती. तिच्या वडिलांचा 2007 मध्ये मृत्यू झाला होता. वडिलांचे छत्र हरपल्यापासून तिची आई, ती स्वत: तिच्या भावासह कष्ट करुन उदरनिर्वाह करत होते.

कोरोनामुळे संपूर्ण जग थांबलं. सरकारी कार्यालयं, खासगी कंपन्या वगैरे सुरु झाल्या असल्या तरी खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र तरीही मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.

मात्र ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी त्या विद्यार्थिनीकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे ती नैराश्यात होती. मोबाईल नसल्याने तिला अभ्यास करता येत नव्हता. त्यामुळे तिला अभ्यासाचा तणाव आला होता. काल (29 सप्टेंबर) दुपारी तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान या घटनेनंतर ओंड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.(SSC Girl Suicide Due to not have Mobile for Online Education)

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनमध्ये गावी अडकली, ऑनलाईन शिक्षणासाठी नेटवर्क नाही, डोंगरदऱ्यात झोपडी टाकून तरुणीचा अभ्यास

ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग खडतर, सोलापुरातील शिक्षकांचा भिंतींवरील शिक्षणाचा नवा प्रयोग

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *