ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग खडतर, सोलापुरातील शिक्षकांचा भिंतींवरील शिक्षणाचा नवा प्रयोग

सोलापूरमधील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाला पर्याय शोधत मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केलाय (Education experiment in Solapur).

ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग खडतर, सोलापुरातील शिक्षकांचा भिंतींवरील शिक्षणाचा नवा प्रयोग

सोलापूर : कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग थांबलं. एकेक करत आता सरकारी कार्यालयं, खासगी कंपन्या वगैरे सुरु झाले आहेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र जिथे एक वेळ खाण्याची अडचण, तिथे ना मोबाईल आहे आणि ना शिक्षण. मात्र, अशा परिस्थितीतही सोलापूरमधील शिक्षकांनी यावर मार्ग शोधत मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केलाय (Education experiment in Solapur).

सोलापुरातील पूर्व भाग हा कामगारांची वसाहत म्हणून ओळखली जातो. येथे राहणाऱ्या हजारो विडी कामगार आणि यंत्रमाग धारकांना काम केले तरच रोजचा घरचा गुजारा चालत असतो. त्यामुळे त्यांच्याकडे ना मोबाईल आहे, ना इंटरनेट. त्यामुळे या भागात ऑनलाईन शिक्षण देणे हे या भागातल्या शिक्षकांसमोर एक मोठे दिव्यच होते. मात्र, येथील शिक्षकांनी एक भन्नाट आयडिया शोधली आहे. यातून ते या भागातील मुलांना आनंददायी शिक्षण देत आहेत आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन, 2.3 कोटी विद्यार्थी-शिक्षकांना लाभ, देशातील पहिलं राज्य

या भागातील अशा मराठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक राम गायकवाड यांच्या संकल्पनेतून गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. राम गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या घरांच्या भिंतीवर रंगवला. जवळपास 180 घरांच्या भिंती रंगवल्या आहेत. आणखी 300 भिंती रंगवल्या जाणार आहेत. भिंतीवर शालेय अभ्यासक्रम, रंगीबेरंगी चित्रं, काढले आहेत. आकर्षक चित्रकृती, अक्षर, गणतीय आकडेमोड, भौगोलिक घडामोडी, विज्ञानातील प्रयोग, सामान्य ज्ञान, स्वच्छतेच्या सवयी, समाजाभिमुख घडामोडी चित्रांच्या माध्यमातून काढण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या घरच्या भिंती रंगवण्यासाठी सुमारे 2 लाखांचा खर्च झाला आहे. हा खर्च शाळेतील शिक्षकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. भिंतीवर रंगवलेली चित्रकृती विद्यार्थी वेळ मिळेल तसे आवडीने वाचत आहेत. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. तशाच प्रकारे शोध लागला नसला तरी किमान त्यातून एक संकल्पना जन्माला आली आहे. त्यातूनच सोलापूरमधील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झालाय. शिक्षकांनी ही संकल्पना मांडील आणि वास्तवातही आणली. त्यामुळे गोरगरिबांची मुलं शिक्षणाच्या मूळ प्रवाहाच्या जवळ आली आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवर त्याचा आनंदही पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

ऑनलाईन शिक्षणाचा ‘व्हीस्कूल पॅटर्न’, महाराष्ट्रातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोफत

ऑनलाईन शिक्षण उपक्रम चांगला, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहतील : विवेक पंडित

पहिली, दुसरी रोज 30 मिनिटं, तिसरी ते आठवी 45 मिनिटे 4 सत्रं, शाळांचं वेळापत्रक जाहीर

Education experiment in Solapur

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *