AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायाखालची जमीन खचणे म्हणजे नेमकं काय? पाहा व्हिडीओ

चीन: पायाखालची जमीन खचणे , ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. पण चीनमध्ये खरोखरच याचा प्रत्यय पाहायला मिळाला. इथे एका महिलेच्या पायाखालून खरोखरच जमीन सरकली आणि ती महिला 10 फुटाच्या सिंकहोलमध्ये पडली. यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. चीनच्या लॅनझोऊ शहरातील गजबजलेल्या रस्त्यालगतच्या फुटपाथवरून चालत असताना अचानकपणे फूटपाथ कोसळून ही दुर्घटना घडली. हा सिंकहोल तब्बल 10 फूट […]

पायाखालची जमीन खचणे म्हणजे नेमकं काय? पाहा व्हिडीओ
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

चीन: पायाखालची जमीन खचणे , ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. पण चीनमध्ये खरोखरच याचा प्रत्यय पाहायला मिळाला. इथे एका महिलेच्या पायाखालून खरोखरच जमीन सरकली आणि ती महिला 10 फुटाच्या सिंकहोलमध्ये पडली. यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. चीनच्या लॅनझोऊ शहरातील गजबजलेल्या रस्त्यालगतच्या फुटपाथवरून चालत असताना अचानकपणे फूटपाथ कोसळून ही दुर्घटना घडली. हा सिंकहोल तब्बल 10 फूट खोल होता. पण सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. 

10 फुटाच्या सिंकहोलमध्ये पडल्याने त्या महिलेच्या बरगड्यां फ्रॅक्चर झाल्या आहेत. मात्र जखमी महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.  चीनच्या ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्ककडून या घटनेचा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये आपण ही घटना कशाप्रकारे घडली हे बघू शकता.

रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद झाली आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे त्याच फूटपाथवर अनेक लोक दिसतात. त्यांच्या मागे या अपघातातील महिला आहे, जी तिथे बसची वाट बघत उभी होती. अचानकपणे तिच्या पायाखालील फूटपाथ कोसळला आणि ती महिला 10 फूट खोल सिंकहोलमध्ये पडली. आजूबाजूचा परिसर ढासळल्याने ती महिला त्याखाली दबली गेली. ती मदतीसाठी हाक देत होती.

यानंतर काही वेळाने पोलीस आणि रुग्णवाहिका त्याठिकाणी दाखल झाल्या. सध्या त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलीस यंत्रणा फूटपाथ कोसळण्यामागील कारणांचा तपास घेत आहेत.

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.