Pune crime | सोसायटीतील निवडणुकीवरून एकास लोखंडी जाळीने गंभीर मारहाण

फिर्यादी व आरोपीची वादावादी झाली. त्यातूनच आरोपीनी तुझ्या वडीलांचा सोसायटीचा फाँर्म मागे का घेतला नाही असे म्हणत फिर्यादीला ढाब्यावरील लोखंडी जाळीने डोक्यात मारून जखमी केले.

Pune crime | सोसायटीतील निवडणुकीवरून एकास लोखंडी जाळीने गंभीर मारहाण
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 8:08 PM

पुणे – जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे तुझ्या वडिलांचा सोसायटीच्या निवडणुकीत भरलेला उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही, असे म्हणत
युवकाला गंभीरमारहाण केल्याच्या घटना घडली आहे. याबाबत तीन जणांवर खेड पोलीस स्थाकानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी घडली घटना

राजगुरू नगर येथे सोसायटीच्या निवडणुकीत जखमी संदीप निवृत्ती कारले यांच्या वडिलांनी निवडणुकीसाठी फॉर्म भरला आहे. घटनेच्यादरम्यान आरोपी काळूराम तात्याभाऊ बढे, किरण देवराम बढे काळूराम बढे हे तिथल्या स्थानिक ढाब्यावर जेवण करायला गेले होते. त्यावेळी जखमी संदीप निवृत्ती कारलेहे ही तिथे उपस्थित होते. दरम्यान फिर्यादी व आरोपीची वादावादी झाली. त्यातूनच आरोपीनी तुझ्या वडीलांचा सोसायटीचा फाँर्म मागे का घेतला नाही असे म्हणत फिर्यादीला ढाब्यावरील लोखंडी जाळीने डोक्यात मारून जखमी केले. या घटनेत फिर्यादी संदीप गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . अधिक तपास खेड दापोलीस करत आहेत.
जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी ही पोलिसांसाठी डोके दुखी ठरत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे वाढटी गुन्हेगारी रोखणे पोलिसांच्या समोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे.

BIS Care App: व्हा स्मार्ट ग्राहक, फसवणुकीला ‘ब्रेक’; गुणवत्तेचं टेस्टिंग आता अ‍ॅपवर!

अधिवेशनाआधी कोरोना टेस्ट होणारच आहे, मग सगळे जवळ जवळ बसू- Ajit Pawar

चंद्रपुरातील गुन्हेगारीत वाढ झाल्यानं दारुबंदी उठवली!, अजित पवारांकडून मुनगंटीवारांना उत्तर