AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIS Care App: व्हा स्मार्ट ग्राहक, फसवणुकीला ‘ब्रेक’; गुणवत्तेचं टेस्टिंग आता अ‍ॅपवर!

ग्राहकांचे फसवणुकीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी भारतीय मानक ब्यूरोने (BSI) वैशिष्ट्यपूर्ण मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तूची गुणवत्तेची पडताळणी BIS Care App अ‍ॅपद्वारे करणे शक्य ठरणार आहे. तसेच वस्तूच्या गुणवत्तेबाबत थेट तक्रार करण्याची सुविधा देखील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

BIS Care App: व्हा स्मार्ट ग्राहक, फसवणुकीला ‘ब्रेक’; गुणवत्तेचं टेस्टिंग आता अ‍ॅपवर!
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 8:05 PM
Share

नवी दिल्ली : ग्राहक हक्कांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरात राष्ट्रीय ग्राहक दिन (National Consumer Day) साजरा केला जात आहे. ग्राहकांचे फसवणुकीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी भारतीय मानक ब्यूरोने (BSI) वैशिष्ट्यपूर्ण मोबाईल अ‍ॅपची (Mobile App) निर्मिती केली आहे. ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तूची गुणवत्तेची पडताळणी BIS Care App अ‍ॅपद्वारे करणे शक्य ठरणार आहे. तसेच वस्तूच्या गुणवत्तेबाबत थेट तक्रार करण्याची सुविधा देखील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. गूगल प्ले स्टोअरवर अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे.

अ‍ॅपवर नेमकं काय?

ग्राहकांना अ‍ॅपद्वारे उपलब्ध होणाऱ्या सुविधा पुढीलप्रमाणे:

o कोणत्याही उत्पादनाचे प्रमाणीकरण तपासणे ग्राहकांना अ‍ॅपद्वारे शक्य ठरणार आहे. अ‍ॅपवरील ‘परवाना तपशील पडताळा’ (‘Verify Licence Details’) वर जाऊन ग्राहक माहिती मिळवू शकतात. o हॉलमार्क दागिन्यांवरील HUID नंबर द्वारे ‘HUID पडताळा’ (Verify HUID) वर जाऊन शुद्धता तपासू शकतात.

o कोणतेही भारतीय मानक, परवाना, प्रयोगशाळेची माहिती ‘तुमचे स्टँडर्ड जाणून घ्या’ (‘Know Your Standards’) वर उपलब्ध आहेत.

o तुम्ही अ‍ॅपद्वारे परवाना आवश्यक असलेल्या उत्पादनांची देखील माहिती प्राप्त करू शकतात.

o इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची गुणवत्ता R-नंबरच्या सहाय्याने ‘R-नंबर पडताळा’ (Verify R-Number) वर तपासली जाऊ शकते.

o तुम्हाला कोणत्याही आयएएस प्रमाणित उत्पादनांबद्दल तक्रार असल्यास तुम्ही थेट अ‍ॅपद्वारे तक्रार नोंदवू शकतात.

..जागो ग्राहक जागो!

केंद्र सरकार ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोणत्याही प्रकारचे नुकसान, खराब उत्पादने तसेच अप्रमाणित सेवा यांच्याबाबत सरकारने जागरुकता निर्माण करण्याचे धोरण स्विकारले आहे. स्वत:च्या पुंजीतून वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकाला निर्भेळ व प्रमाणित वस्तू मिळावी हेच सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे.

BIS म्हणजे काय?

भारतीय मानक ब्यूरो (Bureau of Indian Standards (BIS) ही भारत देशामधील प्रमाणे ठरवणारी एक सरकारी संस्था आहे. भारत सरकारच्या अखत्यारीखालील ही संस्था 23 डिसेंबर 1986 रोजी स्थापन झाली. ही संस्था आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करते. हिचे जुने नाव भारतीय मानक संस्था (Indian Standards Institution) असे होते.

इतर बातम्या :

चंद्रपुरातील गुन्हेगारीत वाढ झाल्यानं दारुबंदी उठवली!, अजित पवारांकडून मुनगंटीवारांना उत्तर

ओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार?; सभागृहातही चर्चा

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.