सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिर संस्थानकडून मोबाईल अॅप तयार, ‘एक खिडकी योजने’चीही सोय

सिद्धिविनायक मंदिरात दिवसाला 1 हजार नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 12 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. भाविकांनी दिलेले नियम पाळून, सर्व काळजी घेत दर्शन घेण्याचं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे.

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिर संस्थानकडून मोबाईल अॅप तयार, 'एक खिडकी योजने'चीही सोय
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 3:23 PM

मुंबई: राज्यातील सर्व मंदिरे सुरु करण्याचे आदेश ‘ही श्रींची इच्छा’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी दिली आहे. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिराकडून भाविकांसाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आलं आहे. तसंच ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांच्यासाठी एक खिडकी योजनेची सोयही करण्यात आली आहे. तशी माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिले आहेत. (Mobile app for devotees from Siddhivinayak Mandir Samiti)

मोबाईल अॅपवरील क्यूआर कोड दाखवून भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय सिद्धिविनायक मंदिराकडून घेण्यात आला आहे. शरिराचं तापमान मोजून आणि मास्क घातला असेल तरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. प्रतितास 100 या प्रमाणे क्यूआर कोड तपासून भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या अॅपवरुन 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मात्र, पुढे परिस्थिती पाहून ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्णय घेतला जाणार आहे.

दिवसाला 1 हजार नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 12 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. भाविकांनी दिलेले नियम पाळून, सर्व काळजी घेत दर्शन घेण्याचं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे. सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने क्यूआर कोडनुसार दर्शन घेतले तरच परवानगी देण्यात येईल, असंही मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

शिर्डीतील साई मंदिरात सोमवारपासून 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय

शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे; त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

तुळजाभवानी मंदिरात रोज 4 हजार भाविकांना दर्शन

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असुन दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ऑनलाइन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत.

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 65 वर्षावरील आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा निर्यम मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

दररोज 4 हजार भाविकांना मिळणार तुळजाभवानीचे दर्शन, ऑनलाईन पाससह ऑफलाईन पास व्यवस्था, 16 तास मंदिर खुले राहणार

राज्यातील मंदिरं सोमवारपासून सुरु होणार, पण सप्तश्रृंगी, काळाराम आणि त्र्यंबकेश्वर मंदिबाबात अद्यापही संभ्रम!

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

Mobile app for devotees from Siddhivinayak Mandir Samiti

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.