मन्नतच्या एका खोलीचं भाडं किती?, शाहरुख म्हणतो…

शाहरुख खानने ट्विटरवर #AskSRK च्या माध्यमातून चाहत्यांना स्वत:ला प्रश्न विचारण्याची संधी दिली. या दरम्यान, शाहरुखला अनेक प्रश्न विचारण्यात आले

मन्नतच्या एका खोलीचं भाडं किती?, शाहरुख म्हणतो...
Shahrukh Khan
| Updated on: Jan 22, 2020 | 8:47 PM

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान सध्या ट्वीटरवर ट्रेंड करत आहे. शाहरुखने (Shah Rukh Khan) बुधवारी त्याच्या तमाम चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. शाहरुख खानने ट्विटरवर #AskSRK च्या माध्यमातून चाहत्यांना स्वत:ला प्रश्न विचारण्याची संधी दिली. या दरम्यान, शाहरुखला अनेक प्रश्न विचारण्यात आले, यामध्ये काही अनोखे प्रश्नही होते. यापैकी एका चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली. शाहरुखच्या एका चाहत्याने त्याच्या घरातील एका खोलीचा भाडं विचारलं. यावर शाहरुखने जबरदस्त उत्तर दिलं.

‘तूफान का देवता’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन चाहत्याने शाहरुखला विचारलं, ‘सर, मन्नतमध्ये एक खोली भाड्याने हवी आहे, कितीमध्ये पडेल?’. यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली. ’30 वर्षांची मेहनत लागेल.’ अनेकांनी शाहरुखच्या या उत्तराला रीट्वीट केलं आहे. शाहरुखच्या या ट्वीटला काहीच वेळात 13 हजारांच्यावर लाईक्स मिळाले आहेत.

एका ट्वीटर युझरने शाहरुखला त्याच्या फ्लॉप सिनेमांबाबत विचारलं. ‘सर्व सिनेमे फ्लॉप होत आहेत, कसं वाटत आहे? उत्तर नक्की द्या’, असा टोमणा या युझरने शाखरुखला मारला. मात्र, शाहरुखने यावर उत्तर देत म्हटलं, ‘फक्त तुम्ही प्रार्थनेत आठवण ठेवा’.