अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही : शरद पवार

| Updated on: Sep 11, 2020 | 2:45 PM

अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते दिल्लीत बोलत होते. (Sharad Pawar on Maratha reservation)

अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही : शरद पवार
Follow us on

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको, कोर्टात जे वकील दिले ते लहान नव्हते, अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते दिल्लीत बोलत होते. (Sharad Pawar on Maratha reservation)

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढायचा निर्णय घेतला, तर मार्ग निघेल. मला त्याबाबत कायदेशीर बाजू माहिती नाही, जर त्याबाबतचा पर्याय निघाला, तर मला वाटतं कोणीही रस्त्यावर उतरणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षणप्रकरणात जे वकील दिले ते ख्यातनाम होते. कपिल सिब्बल किंवा महाधिवक्ते हे ज्युनिअर आहेत का? आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. मला कोर्टाकडून पुन्हा न्याय मिळेल असं वातावरण हवं, असं शरद पवार म्हणाले.

अन्य राज्यात आरक्षण दिले, तर मग महाराष्ट्राने अपेक्षा केली त्यात मला काही गैर वाटत नाही.विरोधक यात सरकारची कमतरता सांगतात, पण विरोधकांना राजकारण करायचं आहे. विरोधकांनी आंदोलन करुन काही होणार नाही. हा प्रश्न कोर्टातूनच सुटणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर मी काही बोलू शकत नाही. पण आम्ही पुन्हा एकदा कोर्टात जाणार, असं शरद पवार म्हणाले.

ड्रग्ज प्रकरण मुंबई पोलिसांनी तपासावे

सुशांत आत्महत्याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे, ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी लक्ष घालावं, असं शरद पवारांनी नमूद केलं. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. ड्रग्सचाच्या विषयात गांभीर्याने लक्ष द्यायची गरज. हे थांबवायला हवं.

कंगनावर नियमानुसार कारवाई

कंगना रनौतवर जी कारवाई केली ती मुंबई महापालिकेने केली. माझ्या माहितीनुसार महापालिकेच्या कायद्यानुसार ही कारवाई झाली. यामध्ये राज्य सरकारचा काही संबंध नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

(Sharad Pawar on Maratha reservation)

संबंधित बातम्या  

Maratha Reservation | मराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग, वैद्यकीय प्रवेश-भरतीत तूर्त आरक्षण नाही