Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा चीनी ‘टिकटॉक’ला टक्कर देणार!

| Updated on: Nov 02, 2020 | 1:12 PM

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा याचे हे नवे अॅप www.jlstream.com वर चीन वगळता संपूर्ण जगभरात उपलब्ध होणार आहे.

Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा चीनी ‘टिकटॉक’ला टक्कर देणार!
Follow us on

मुंबई : साधारण एका महिन्यापूर्वी भारताने टिकटॉक, पबजी, बिगोसह 100 हून अधिक चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या नंतर बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने पबजी प्रेमींसाठी पर्याय म्हणून भारतीय ‘फौ-जी’ तयार करणार असल्याचे म्हटले होते. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा (Shilpa Shetty) आणि तिचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) हे देखील टिकटॉकला टक्कर देणाऱ्या भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅपची निर्मिती करत असल्याचे कळते आहे. (Shilpa Shetty and Raj Kundra Lanching New App similar to tiktok)

स्वतः राज कुंद्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ‘जेएल स्ट्रीम हे अनेक वैशिष्ट्यांसह बनविलेले भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅप आहे. काही चिनी अ‍ॅप्स भारतात बंदी असूनही सर्व्हर सुरू ठेवून आणि मिकोचे मिका असे नाव बदल करून सर्रास भारतात वापरले जात आहेत. चीनी अ‍ॅप्सवर बंदी असल्याने ते हाँगकाँगचे असल्याचा दावा करतात. अशा अपराधींना शिक्षा झाली पाहिजे. भारतीयांनी अशा अ‍ॅप्सना प्रोत्साहन न देता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे’.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा याचे हे नवे अ‍ॅप www.jlstream.com वर चीन वगळता संपूर्ण जगभरात उपलब्ध होणार आहे.(Shilpa Shetty and Raj Kundra Lanching New App similar to tiktok)

177 चीनी अ‍ॅप बॅन

गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमारेषा भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनला एक मोठा दणका देण्यात आला होता. भारतात PUBG  या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह तब्बल 118 चिनी अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात PubG, Ludo World, Cleaner, AppLock यांसही इतर अ‍ॅपचा समावेश आहे.

दरम्यान यापूर्वी भारताने यापूर्वी 59 चिनी अ‍ॅप बॅन केले होते. यात TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings या अ‍ॅपचा समावेश होता. त्यानंतर पुन्हा एकदा PUBG सह इतर 118 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे आता एकूण 177 प्रसिद्ध आणि लोकप्रिय चिनी अ‍ॅप वापरण्यावर भारतात बंदी आहे.

50 कोटीपेक्षा जास्त युजर्स

‘टिकटॉक’ हे चीनमध्ये तयार करण्यात आलेले अ‍ॅप (Tik Tok Ban In India) आहे. चीनमध्ये हे अ‍ॅप ‘डॉयइन’ नावाने प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2016 साली चीनने ‘डॉयइन’ या अ‍ॅपला चीनच्या ऑनलाईन मार्केटमध्ये लाँच केले होत. त्यानंतर वर्षभरात ‘टिक टॉक’ या नावाने हे अ‍ॅप जगभरात लाँच झाले होते. जगभरात या अ‍ॅपचे सुमारे 500 मिलियन अर्थात 50 कोटीपेक्षा जास्त युजर्स होते.

(Shilpa Shetty and Raj Kundra Lanching New App similar to tiktok)