सुजय‌ विखेंचं पंतप्रधान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांना दिवाळी गिफ्ट, खास ‘साई ब्लेसिंग बॉक्स’ पाठवला

| Updated on: Nov 05, 2020 | 5:46 PM

सुजय‌ विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे तसंच‌‌ देशातील सर्व खासदार आणि राज्यातील सर्व आमदारांना साई ब्लेसिंग बॉक्स दिपावलीच्या शुभेच्छा म्हणून पाठवले आहेत.

सुजय‌ विखेंचं पंतप्रधान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांना दिवाळी गिफ्ट, खास साई ब्लेसिंग बॉक्स पाठवला
Follow us on

शिर्डी : भाविकांना तसंच आपल्या आप्तेष्टांना साईबाबांचे‌ आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची‌ संकल्पना राबवण्यात‌ आली आहे. भाजपचे खासदार ‌सुजय‌ विखे यांच्या‌ हस्ते ‌या ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे‌‌ उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार सुजय‌ विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे तसंच‌‌ देशातील सर्व खासदार आणि राज्यातील सर्व आमदारांना साई ब्लेसिंग बॉक्स दिपावलीच्या शुभेच्छा म्हणून पाठवले आहेत. (Shirdi BJP MP Sujay Vikhe Patil sent Sai Blessing Box to the Prime Minister and cm as gift on Diwali occasion)

देश-विदेशात साईबाबांचे लाखो भक्त आहेत. साईबाबांवर भाविकांची मोठी श्रद्धा असल्याने कोरोनाच्या‌ संकटात अनेक भाविक घरूनच बाबांची पुजा-अर्चना करत आहेत. साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत. असंख्य भाविक मंदिर खुले करण्याची वाट बघत आहेत. पण या जीवघेण्या कोरोना संकटात साईबाबांचे आशिर्वाद मिळावेत या‌ ‌संकल्पनेतून शिर्डीचे प्रसिद्ध चित्रकार हेमंत यांनी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून घरपोच साई ब्लेसिंग बॉक्सची संकल्पना राबवली आहे. स्वत: सह मित्र, आप्तेष्ट नातेवाईक यांना‌देखील हे बॉक्स पाठवण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भाजपचे खासदार सुजय‌ विखे, माजी ‌जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे तसेच धनश्री ‌विखे यांच्या उपस्थित हा सोहळा साई मंदिराजवळ पार पडला. सुज‌य यांनी उद्घटनावेळी पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते यांचेसह ‌सर्व खासदारांना दिवाळी निमित्त ही भेट पाठवत असल्याचं सांगितलं आहे. (Shirdi BJP MP Sujay Vikhe Patil sent Sai Blessing Box to the Prime Minister and cm as gift on Diwali occasion)

या गिफ्ट‌ बॉक्समध्ये महिला बचत गटांकडून खरेदी‌ केलेल्या‌ साईबाबांच्या विविध वस्तू‌ असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या ‌महिलांना यामुळे दिलासा‌ मिळणार असून त्यांची‌ दिवाळीदेखील गोड‌ होणार असल्याचं माजी‌ जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

या‌‌ साई ब्लेसिंग बॉक्समध्ये साई समाधीवरील फुलांपासून बनवेलेली अगरबत्ती, झेंडू फुलांपासून बनवलेला अष्टगंध, चित्रकार हेमंत वाणी यांनी रेखाटलेले साई कृपा दृष्टी‌ चित्र, साई नामस्मरण सीडी, अगरबत्ती स्टँन्ड, गाई‌च्या गौरीपासून बनवलेले धुप, अगरबत्ती स्टँण्ड‌, मेणबत्ती‌‌, दिवा अशा नऊ वस्तूंचा‌ समावेश आहे. हा बॉक्स 1500 रुप‌यांना देण्यात येणार असून‌‌ ज्या भाविकांसाठी‌ तो पाठवण्यात‌ येणार आहे त्यांच्या नावाने साई संस्थानच्या अन्नदानासाठी 51 रुपयांची‌‌ देणगी पावती सदर बॉक्समध्ये असणार आहे.

तर साई ब्लेसिंग बॉक्सच्या‌ माध्यमातून मिळालेल्या रकमेतील काही रक्कम साईबाबांना दान देण्याचा मानस असल्याचे चित्रकार हेमंत वाणी यांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या –

पुण्यात हॉटेल चालकावर गोळीबार, पाच दिवसात आरोपींना अटक

एका वर्षात 1 लाखाचे झाले 9 लाख रुपये, या गुंतवणुकीत मिळाला बंपर रिटर्न

(Shirdi BJP MP Sujay Vikhe Patil sent Sai Blessing Box to the Prime Minister and cm as gift on Diwali occasion)