प्रकल्पांची पळवापळवी; अमित देशमुखांवर विनायक राऊतांची टीका

महाविकास आघाडीत प्रकल्पांची पळवापळवी होऊ नये,वरिष्ठांनी याबाबत मध्यस्थी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

प्रकल्पांची पळवापळवी; अमित देशमुखांवर विनायक राऊतांची टीका
| Updated on: Oct 06, 2020 | 11:32 AM

मुंबई: वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोकणातील प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केली आहे. त्यावरून देशमुख यांच्यावर शिवसेनेने टीका केली आहे. महाविकास आघाडीत प्रकल्पांची पळवापळवी होऊ नये,वरिष्ठांनी याबाबत मध्यस्थी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. (vinayak raut criticized amit deshmukh)

विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित देशमुख यांच्या मागणीवर तीव्र नापसंती व्यक्त केली. महाविकास आघाडीत प्रकल्पांची पळवापळव होऊ नये. यासाठी वरिष्ठांनी मध्यस्थी करावी. वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यास आघाडीत समन्वय राहील, असं राऊत म्हणाले.

सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच याबाबत चर्चा करण्यासाठी देशमुख यांच्याकडे वेळ मागितला होता. पण त्यांनी वेळच दिला नाही. या संदर्भात पत्रव्यवहार केला असता त्याला उत्तरंही देण्यात आली नाही, अशी टीका नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट लातूरला नेण्याची मागणी केली होती. त्यावरून राऊत यांनी नाराजी व्यक्त केल्याने आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

केंद्र सरकारचा हा प्रकल्प दोडा मार्गावरील आढाळी येथे उभारण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाने त्याला मंजुरीही दिली आहे. मात्र, अमित देशमुख यांनी अचानक हा प्रकल्प लातूरला हलविण्याची मागणी केल्याने त्याला शिवसेनेतून विरोध होत आहे. (vinayak raut criticized amit deshmukh)

जठार यांची टीका

आता आणखी काय केले म्हणजे केंद्राच्या या पर्यावरण पूरक आयुर्वेदीक वनस्पतीवर संशोधन प्रकल्पाला शिवसेना सरकार सिंधुदुर्गात आडाळीत जागा देईल?, असा सवाल माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. हा प्रकल्प सिंधुदुर्गात व्हावा म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती करतात आणि कोकणातील आमदारांच्या जीवावर उभे असलेल्या ठाकरे सरकारचे मंत्री हा प्रकल्प लातूरला पळवण्याची भाषा करतात. हा प्रकल्प ठाकरे सरकारला कोकणात नकोय तर या सरकारला हवे तरी काय आहे?, असा सवालही त्यांनी केला. नाणार नको, सी वर्ल्ड नको आणि आता हा प्रकल्पही नको. मग कोकणचा विकास करणार तरी कसा? याचे उत्तर या सरकारने द्यावे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

जळगावात परतीच्या पावसाने पिकं झोपवली, बळीराजा हवालदिल

नुकसानीचे पंचनामे होत आहेत का?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

Bharat Band LIVE | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी

(vinayak raut criticized amit deshmukh)