नुकसानीचे पंचनामे होत आहेत का?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळजवळ 1800 पेक्षा अधिक गावं यामुळे प्रभावित झाली. (Devendra Fadnavis letter to Uddhav Thackeray on heavy rains in Vidarbha and Marathwada.)

नुकसानीचे पंचनामे होत आहेत का?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : विदर्भातील पूरस्थिती आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या (heavy rain) पार्श्वभूमीवर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे. (Devendra Fadnavis letter to Uddhav Thackeray on heavy rains in Vidarbha and Marathwada.)

देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणतात, “दोन दिवसांपूर्वी संपूर्ण मराठवाड्याला अतिवृष्टीने (heavy rain) झोडपले. यंदा चांगला चांगला पाऊस झाल्याने पिके चांगली आली होती. पण अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुपीक मातीसुद्धा वाहून गेली आहे. जवळजवळ 1800 पेक्षा अधिक गावं यामुळे प्रभावित झाली. सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा तसेच अन्यही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही तालुक्यांमध्ये तर नुकसान हे 70 टक्क्यांवर आहे.”

तसेच, जालना जिल्ह्याच्या काही भागात मोसंबीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. सावरगाव, भिलपुरी, मौजपुरी, माणेगाव, नसडगाव आणि इतरही तालुक्यांमध्ये मूग, उडीद, सोयाबीनसारखी पिकं खराब झाली आहेत. परभणी जिल्ह्यात अजूनही शेतात पाणी आहे. गंगापूर, खुलताबाद याही भागात मोठे नुकसान झाले. मूग, उडीद या पिकांना फटका बसला. तर काही शेतकर्‍यांनी पिकाला शेतात काढून ठेवल्याने त्यांना शेतातच कोंब फुटले आहेत.”

यासारखीच स्थिती मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

“मराठवाड्यात घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णपणे खचला आहे. अशात केवळ मंत्र्यांनी दौरे करायचे आणि पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असे सांगून मोकळे व्हायचे, असे करुन चालणार नाही. नुकसानीचे पंचनामे होत आहेत का? असा प्रश्न उपस्थित करुन यावर लक्ष देण्याची  गरज फडणवीसांनी व्यक्त केली.

“शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार म्हणून ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येसुद्धा अतिवृष्टीचा फटका बसला आहे”, असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, विदर्भात पूर आला तेव्हाही मदत करु, अशा घोषणा केल्या गेल्या. पण, केवळ 16 कोटी रुपयांची मदत केली गेली. विदर्भातील पूरग्रस्तांसोबत अन्याय केल्यानंतर आता मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जाऊ नयेत, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच, केवळ पोकळ घोषणा करुन, पंचनाम्याचे आदेश दिले असे सांगून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

संबंंधित बातम्या :

मराठवाड्यात 3.28 लाख हेक्टरी शेतीच नूकसान

Dada Bhuse | मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान – कृषीमंत्री दादा भुसे

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

(Devendra Fadnavis letter to Uddhav Thackeray on heavy rains in Vidarbha and Marathwada.)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI