जळगावात परतीच्या पावसाने पिकं झोपवली, बळीराजा हवालदिल

जळगावात आठवड्याभरापासून परतीचा जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

जळगावात परतीच्या पावसाने पिकं झोपवली, बळीराजा हवालदिल
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 10:27 AM

जळगाव : सलग चार ते पाच वर्षांपासून भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पूर्ण हंगामात गरजेपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तसेच आता आठवड्याभरापासून परतीचा जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. ओल्या दुष्काळाने खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Huge crop damage due to heavy rain in Jalgaon)

जळगाव जिल्ह्यात यावर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने थोडा ब्रेक घेतला. त्यानंतर पूर्ण सप्टेंबर महिना पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला. त्यामुळे खरीप हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यात येणारे मूग, उडीद या कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कडधान्य पिके अक्षरशः जळून गेली. या धक्क्यातून सावरत नाही तोच आता शेतकऱ्यांसमोर दुसरे संकट उभे राहिले आहे.

आठवड्याभरापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू असल्याने ज्वारी, बाजरी, मका पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस तसेच सकाळच्या वेळी पडणारे धुके यामुळे ज्वारी, बाजरी, मक्याची कणसे काळी पडली आहेत. काही ठिकाणी तर कणसांना कोंब फुटले आहेत. कापणी झालेली कणसे देखील भिजून कुजली आहेत. पूर्वहंगामी आणि हंगामी कापसाच्या पिकाला देखील पावसाचा फटका बसला आहे.

अतिपावसामुळे कापसाची बोंडे कुजली आहेत. बोंडांमधून बाहेर आलेला कापूस भिजून खराब झाला आहे. अनेक शेतांमध्ये वादळामुळे पिके जमिनदोस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची लागवड होते. त्यात हंगामी आणि पूर्वहंगामी कापसाचे सर्वाधिक साडेचार ते पाच लाख हेक्टर क्षेत्र असते. त्याखालोखाल दीड ते पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्र ज्वारी, बाजरी, मका पिकांचे असते. यावर्षी अतिपावसामुळे ज्वारी, बाजरी तसेच मका पिकांचे निम्म्याहून अधिक म्हणजे सुमारे एक ते सव्वालाख हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. उर्वरित क्षेत्रातील पिकांची गुणवत्ता ढासळली आहे. पावसाचा मुक्काम लांबल्याने रब्बीच्या मशागतीला मर्यादा आल्या आहेत. शेतांमध्ये वाफसा नसल्याने मशागत करणे शक्य नाही. त्यामुळे रब्बी हंगामावरही काहीअंशी परिणाम होणार आहे.

जळगाव जिल्ह्यात सलग चार ते पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत होता. यावर्षी वरुणराजाची चांगली कृपादृष्टी राहिल्याने दुष्काळ धुतला गेला खरा; पण ओल्या दुष्काळाने शेतकरी अडचणीतून बाहेर येऊ शकला नाही. अतिपावसामुळे कडधान्य पिके तर हातून गेलीच आहेत. आता पाऊस थांबला नाही तर कापसासारखे नगदी पिकही वाया जाण्याची भीती आहे.

संबंधित बातमी

नुकसानीचे पंचनामे होत आहेत का?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

Bharat Band LIVE | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी

(Huge crop damage due to heavy rain in Jalgaon)

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.