फिलिपीन्स ते मुंबई, मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते नवी मुंबई, फिलिपीन्सच्या कोरोना रुग्णाचा धक्कादायक प्रवास

| Updated on: Mar 19, 2020 | 11:52 PM

एकीकडे मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कस्तुरबा रुग्णालयात असलेल्या एका फिलिपीन्स नागरिकाची प्रकृती खालावल्याचं समोर आलं आहे (Philippines Corona patient Journey in India).

फिलिपीन्स ते मुंबई, मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते नवी मुंबई, फिलिपीन्सच्या कोरोना रुग्णाचा धक्कादायक प्रवास
Follow us on

मुंबई :  एकीकडे मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कस्तुरबा रुग्णालयात असलेल्या एका फिलिपीन्स नागरिकाची प्रकृती खालावल्याचं समोर आलं आहे (Philippines Corona patient Journey in India). विशेष म्हणजे या कोरोनाबाधित व्यक्तीनं मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केल्याचं समोर आलं आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला (Philippines Corona patient Journey in India).

दुबईतून आलेल्या प्रवाशांनी महाराष्ट्रात कोरोना आणल्याचं समोर आलं होतं. पण, कोरोनानं फिलिपीन्समार्गेही भारतात प्रवेश केल्याचं समोर आलं आहे. एका धार्मिक कार्यक्रमासाठी फिलिपीन्समधून 59 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण एकूण 10 जणांच्या गटासह मुंबईत आला. तो सर्वात अगोदर मुंबईत आला. त्यानंतर तो नवी मुंबईत गेला आणि धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईतून दिल्लीला गेला. विशेष म्हणजे त्यानंतर तो दिल्लीतून पुन्हा मुंबईत आला आणि नवी मुंबईतील वाशी येथे गेला.

हेही वाचा : देशात ‘कोरोना’चा चौथा बळी, पंजाबमध्ये एकाचा मृत्यू

तिथे रुग्णाची प्रकृती खालावली आणि त्याला वाशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्याला उपचारासाठी थेट कस्तूरबा रुग्णालयात हलवणलं. कस्तूरबा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं.

मुंबई महापालिका, कस्तुरबा रुग्णालय आणि नवी मुंबईतील त्या खासगी डॉक्टरामुळे फिलिपीन्समधील या कोरोनाबाधितांचा शोध लागला आणि वेळीच संसर्ग टाळण्यासाठी पावलं उचलली गेली. पण, फिलिपीन्सच्या नागरिकांमुळे मुंबईतील कोरोनानं आता जीवघेणं रुप घेतल्याचं समोर येत आहे.

धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या या फिलिपीन्स नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं आणि त्यांच्या चाचण्या करण्याचं नवं आव्हान यंत्रणेसमोर उभं ठाकलं आहे. कोरोनाचा धोका टाळणं ही केवळ सरकार आणि महापालिकांचीच जबाबदारी नाही. तर खासगी संस्था आणि असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनीदेखील काळजी घेण्याची गरज आहे.

कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास

3 मार्च – फिलिपीन्समधून या बाधितासह एकूण 10 जणांना गट मुंबईत आला. या सर्वांची राहण्याची व्यवस्था वाशीतील नूर मशिदीत करण्यात आली.
5 मार्च – फिलिपीन्समधून आलेला हा गट वाशीतून मुंबई सेंट्रल स्थानक आणि तिथून रेल्वेमार्गे दिल्लीला गेला.
6 मार्च – दिल्लीतील एका मशिदीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली
7 ते 9 मार्च – दिल्लीतील मशिदीत धार्मिक कार्यक्रमात हा गट सहभागी झाला
10 मार्च – रेल्वे मार्ग हा गट दिल्लीतून मुंबईला परतला आणि पुन्हा वाशीच्या मशिदीत मुक्कामाला पोहोचला
10 मार्च – या 10 जणांच्या गटातील 59 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्यानं डॉक्टरकडे नेण्यात आलं, तपासणीनंतर डॉक्टरांना त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवले
12 मार्च – तपासणी अहवालात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं
13 मार्च – वाशी आणि दिल्लीतील या गटानं वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या
14 मार्च – या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं
17 मार्च – 59 वर्षीय बाधिताची प्रकृती खालावली असून, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं