AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput Case | जामिनासाठी पुन्हा खटाटोप सुरू, शौविक चक्रवर्तीकडून न्यायालयात जामीन अर्ज दाखल!

तब्बल 4 वेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आतातरी त्याची सुटका केली जाईल अशी आशा अभिनेत्री रिया चक्रवर्तीला वाटते आहे.

Sushant Singh Rajput Case | जामिनासाठी पुन्हा खटाटोप सुरू, शौविक चक्रवर्तीकडून न्यायालयात जामीन अर्ज दाखल!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 07, 2020 | 2:42 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Shushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण (Drugs Connection) समोर आले. या ड्रग्ज कनेक्शनमध्ये सुशांतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली. याप्रकरणी काही ड्रग्ज तस्करांसह, रिया आणि शौविकला अटक करण्यात आली होती. रिया आणि शौविकने तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आता पुन्हा एकदा शौविक चक्रवर्तीने मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे (Showik Chakraborty files bail application in special NDPS court).

तब्बल 4 वेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आतातरी त्याची सुटका केली जाईल अशी आशा अभिनेत्री रिया चक्रवर्तीला वाटते आहे. शौविकला ड्रग्ज बाळगणे, खरेदी करणे आणि विक्री करणे अशा गंभीर आरोपाखाली तुरुंगात टाकले गेले आहे.

मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टात शौविकने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका आदेशात म्हटले होते की, एनसीबी अधिकाऱ्यांच्या समोर दिलेला कबुली जबाब अद्याप कोर्टाने स्वीकारलेला नाही, अशावेळी आरोपींना जबरदस्ती तुरूंगात ठेवता येणार नाही.’ या आदेशानंतर आता पुन्हा एकदा जामिनासाठी शौविकची धडपड सुरू झाली आहे. (Showik Chakraborty files bail application in special NDPS court)

रियाची सुटका

तब्बल 3 वेळा जामीन अर्ज नाकारल्यानंतर अखेर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. यावेळीही शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. रिया ड्रग्ज सिंडिकेटची (Drug Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे पुरावे NCB देऊ न शकल्याने, रियाला जामीन देण्यात आला होता.

दुसऱ्या व्यक्तीला अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे दिले म्हणजे देणारी व्यक्ती त्याला उत्तेजन देत आहे आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम 27-अ अन्वये अमली पदार्थांसाठी वित्तपुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्यासारखे होते, हा एनसीबीचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना नमूद केले होते.(Showik Chakraborty files bail application in special NDPS court)

शौविक चक्रवर्तीच्या जामीन अर्ज निकालावरील कोर्टाचे निरीक्षण

शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) हा अमलीपदार्थांचा बेकायदा पुरवठा करणाऱ्या टोळीचा आणि साखळीचा एक भाग आहे, हे दाखवणारे पुरेसे पुरावे या टप्प्यावर एनसीबीने सादर केले आहेत. हे पुरावे पाहता शौविकचा अनेक अमलीपदार्थ विक्रेत्यांशी (Drugs Syndicate) परिचय होता. तसेच तो सतत त्यांच्या संपर्कात होता. त्यांच्यासोबत व्यवहारही करत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे त्याला सध्या जामीन मंजूर करता येणार नाही, असे त्याचा जामीन अर्ज फेटाळताना कोर्टाने म्हटले होते. तसेच तपास पूर्ण झाल्यानंतर, शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) विशेष एनडीपीएस कोर्टात जामिनासाठी अर्ज करू शकतो, असेही हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटले होते.

(Showik Chakraborty files bail application in special NDPS court)

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली….

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?