घरगुती वाद टोकाला गेला, मग भावजयीने थेट…; कुठे घडली घटना?

क्षुल्लक कारणातून नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घरगुती वाद टोकाला गेला, मग भावजयीने थेट...; कुठे घडली घटना?
सांगलीत घरगुती वादातून तरुणाची हत्या
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 02, 2023 | 12:09 PM

सांगली : क्षुल्लक कारणातून भावजयीने मुलगा आणि अन्य दोघांच्या मदतीने दिराचा काटा काढल्याची खळबळजनक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. सांगलीतील तासगाव शहरातील इंदिरानगरमध्ये गुरुवारी सकाळी ही घटना घडली. सूरज उर्फ लल्या दिनकर शिंदे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. भावजय, पुतण्या आणि अन्य दोघे अशा चौघांनी मिळून चाकूने वार करून तरुणाची हत्या केली. हत्ये प्रकरणी भावजय जानकी दिपक शिंदे, तिचा मुलगा गोपाळ दिपक शिंदे या दोघांना अटक केली आहे. तर जतीन आणि अजय जाधव हे दोघे फरार आहेत. याप्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे करत आहेत.

घरगुती वादातून हत्या

घरगुती वादातून सूरजची हत्या करण्यात आली आहे. लाल्या शिंदे हा या कुटुंबीयांना सतत त्रास देत होता आणि तो चाकू घेऊन त्यांना मारायला आला होता. यावेळी कुटुंबासोबत त्याची वादावादी झाली होती. हातातील चाकूने तो आपल्याला मारेल या भीतीने त्याच्या हातातील चाकू घेऊन त्याला मारून टाकले.

दोघांना अटक, दोघे फरार

सूरज उर्फ लाल्यावर गळ्याजवळ, खांद्याच्या मागे, डाव्या हाताच्या दंडावर आणि उजव्या खांद्याजवळ चाकूने वार करून हत्या केली. हत्येची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी चौघांची नावे निष्पन्न झाल्यानंतर मयत शिंदे याची भावजय आणि पुतण्या यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अन्य दोन फरार आरोपींचा शोध घेत आहेत.