Solapur Corona | कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार करणारी सोलापूरची जिगरबाज कविता ताई!

कविता चव्हाण असे या धाडशी तरुणीचे नाव असून ती आणी तिचे सहकारी पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करते आहेत.

Solapur Corona | कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार करणारी सोलापूरची जिगरबाज कविता ताई!
| Updated on: Jun 26, 2020 | 11:47 PM

सोलापूर : कोरोनाने सगळी समीकरणे, सगळी गृहितकं बदलून (Funeral Of People Who Died Due To Corona) टाकली आहेत. जगण्याची पद्धत बदलली. कोरोनाने लोकांमध्ये अशी दरी निर्माण केली, की हक्काच्या माणसांना सुद्धा अंत्यसंस्काराला उपस्थित राहता येत नाही. ना अश्रूंचा हंबरडा, ना आप्तस्वकियांकडून खांदा दिला गेला. इतकंच काय तर परिवारातील लोकांकडून रचल्या गेलेल्या सरणावर चिताग्नी सुद्धा देता (Funeral Of People Who Died Due To Corona) आली नाही.

कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनावर आली. त्यांनाही मर्यादा आल्या, अपुरे मनुष्यबळ यामुळे दिरंगाई होऊ लागली. त्यामुळे मृतांच्या अंत्यसंस्काराला दिरंगाई होऊ नये, म्हणून एक तरुणी पुढे आली आहे.

सोलापुरात एकीकडे कोरोना बाधितांचाआकडा वाढत असताना दुसरीकडे, कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या लोकांवर उपचार सुरु असताना दगावणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. कोरोनाने मृत झालेल्या परिवारातील लोक कुठे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर कुणी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा लोकांची अंत्यसंस्काराची जबाबदारी महानगरपालिकेची आहे (Funeral Of People Who Died Due To Corona).

मात्र नैसर्गिक मृत्यू, कोरोनाने मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या पाहता अंत्यसंस्कार करताना त्यांनाही मर्यादा येत आहेत. अशावेळी एक धाडशी तरुणी मदतीला धावली आहे. कविता चव्हाण (Kavita Chavan) असे या धाडशी तरुणीचे नाव असून ती आणि तिचे सहकारी पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करत आहेत.

सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत कोरोनाच्या बाधेमुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांवर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कधी एक दिवस तर कधी दोन दिवस अंत्य संस्काराला वेळ लागत असे. मात्र, कविता चव्हाण आणि तिचे सहकारी हे सोपस्कार पार पाडत आहेत. दिवसभरात कधी दोन, तर कधी तीन, तर कधी 9 जणांचे अंत्यसंस्कार कोणताही मोबदला न घेता हे लोक करत आहेत. शेवटचा निरोप देताना आप्तस्वकीय नाहीत, म्हणून काय झालं माणुसकी सोबत आहे, असं कविताने सांगितलं.

कविता चव्हाण आणि तिच्या सहकाऱ्यांनी पालिकेकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी केव्हाही सज्ज असल्याचं सांगितलं. सुरुवातीला पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही विश्वास बसला नाही. मात्र, कविता चव्हाण आणि तिचे सहकारी कोरोनाने मृताचे शव संबंधित हॉस्पिटलमधून ताब्यात घेतात आणि त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी विद्युत दाहिनीवर, तर कधी सरणावर. विशेष म्हणजे हे करत असताना सुरक्षेबाबत सगळी खबरदारी घेतली जात आहे.

Funeral Of People Who Died Due To Corona

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना मोठा आधार, निवृत्तीपर्यंत शासकीय निवास, 65 लाखांची मदत

औरंगाबादचे अधिकारी दाम्पत्य क्वारंटाईन, आस्तिक कुमार-मोक्षदा पाटलांच्या आचाऱ्याला कोरोना

हाताखाली 30-40 कामगार, आता नोकरी गेली, मेकॅनिकल इंजिनियर इडलीवाला बनला, छोट्या सुरुवातीने मोठी तयारी