दक्षिण कोरियात भाजप नेते आणि पाकिस्तानी समर्थक भिडले

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्येही 'मोदी, दहशतवादी, भारत दहशतवादी', अशा घोषणा (South Korea Pakistan slogans) दिल्या जात होत्या, ज्याला भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांनी सडेतोड उत्तर दिलं. शेकडो लोक यावेळी रस्त्यावर जमले होते.

दक्षिण कोरियात भाजप नेते आणि पाकिस्तानी समर्थक भिडले
| Edited By: | Updated on: Aug 17, 2019 | 9:55 PM

सेऊल, दक्षिण कोरिया : काश्मीर प्रश्नाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. पाकिस्तानचे जगभरात राहणारे नागरिक (South Korea Pakistan slogans) भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निषेध करत आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्येही ‘मोदी, दहशतवादी, भारत दहशतवादी’, अशा घोषणा (South Korea Pakistan slogans) दिल्या जात होत्या, ज्याला भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांनी सडेतोड उत्तर दिलं. शेकडो लोक यावेळी रस्त्यावर जमले होते.

भाजप नेत्या शाझिया इल्मी या काही आरएसएस नेत्यांसह सध्या सेऊलमध्ये आहेत. रस्त्यावर ‘मोदी, दहशतवादी, भारत दहशतवादी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी फक्त तीन भारतीय होते आणि शेकडो पाकिस्तानी समर्थक जमले होते. पण आरएसएस नेत्यांनीही यावेळी भारत जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

पाहा व्हिडीओ :