AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Result mahresult.nic.in : दहावीच्या निकालाची तारीख ठरली

SSC Result mahresult.nic.in : दहावीचा निकाल उद्या शनिवारी 8 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

SSC Result mahresult.nic.in : दहावीच्या निकालाची तारीख ठरली
| Updated on: Jun 08, 2019 | 7:29 AM
Share

SSC Result mahresult.nic.in पुणे : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, आता दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांना आपल्या निकालाचे वेध लागले आहेत. दहावीचा निकाल उद्या शनिवारी 8 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालासंबंधीत विविध तारखा फिरत होत्या.  मात्र तो मेसेज चुकीचा असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं होत. त्यानंतर आज अखेर बोर्डाने  उद्या 8 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केलं.

निकाल कुठे पाहाल ?

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

दहावीचा निकाल कसा पाहाल?

दहावीचा निकाल पाहताना तुमचा बोर्ड परीक्षा क्रमांक जवळ असायला हवा. जेव्हा तुम्ही रिझल्ट वेबसाईटवर जाल, तेव्हा तिथे परीक्षा क्रमांक टाईप करावा लागले. कुठल्याही स्पेसशिवाय तुमचा परीक्षा क्रमांक टाईप करा. नंतर आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं टाईप करा.

उदाहरणार्थ :समजा तुमचा परीक्षा क्रमांक M123456 असेल आणि आईचे नाव कावेरी असेल, तर तुम्ही रिझल्ट वेबसाईटवर पहिल्या कॉलममध्ये M123456 आणि दुसऱ्या कॉलममध्ये म्हणझे आईच्या नावाच्या कॉलममध्ये KAV असे टाईप करा. त्यानंतर एन्टर केल्यावर तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल.

दरम्यान, दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. त्यानंतर मग काही दिवसांनी आपापल्या शाळेतून विद्यार्थी निकालाचे प्रमाणपत्र घेऊ शकतात. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीचे बोर्ड दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख, वेळ कधी जाहीर करतं, हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...