Pulwama Attack : शहिदांच्या कुटुंबाला कोणत्या राज्याची किती मदत?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

नवी दिल्ली :  जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 37 जवानांना वीरमरण आले. उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यामुळे 37 जवानांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी प्रत्येक राज्यातील सरकार पुढे सरसावली आहे. महाराष्ट्र, आसाम, ओदिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी शहिदांच्या […]

Pulwama Attack : शहिदांच्या कुटुंबाला कोणत्या राज्याची किती मदत?
Follow us on

नवी दिल्ली :  जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 37 जवानांना वीरमरण आले. उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यामुळे 37 जवानांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी प्रत्येक राज्यातील सरकार पुढे सरसावली आहे. महाराष्ट्र, आसाम, ओदिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

महाराष्ट्र :

पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण आले. यामध्ये बुलडाण्याचे जवान संजय राजपूत आणि जवान नितीन राठोड शहीद झाले. महाराष्ट्र सरकारने या दोन्ही जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर या दोन्ही जवानांचे फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

वाचा : Pulwama Attack: सलाम!! बुलडाण्याचे दोन वीर धारातीर्थी!

उत्तर प्रदेश :

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 12 जवान शहीद झाले आहेत. या जवानांच्या कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकरने प्रत्येकी 25 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

आसाम :

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. त्यांनी आसाममधील शहीद सीआरपीएफ जवान मुनेश्वर बासुमतरी यांच्या कुटुंबियांना 20 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मुनेश्वर बासुमतरी यांच्या बलिदानाला देश कधीही विसरणार नाही असेही सोनोवाल म्हणाले.

राजस्थान :

राजस्थानचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले. शहीद जवान रोहिताश लांबा, शहीद जवान हेमराज मीणा, शहीद जवान जीतराम गुर्जर, शहीद जवान भागीरथ कसाना आणि शहीद जवान नारायण लाल गुर्जर असे या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांची नावे आहेत. या शहिदांच्या कुटुंबियांना राजस्थान सरकारने प्रत्येकी 25 लाख रुपये आणि कुटुंबियांपैकी एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच, शहीद जवानांच्या पत्नींना, त्यांच्या आई-वडिलांना आणि त्यांच्या मुलांनाही अनेक सवलती देण्यात येणार आहेत.

ओदिशा :

या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 37 जवानांपैकी दोन जवान हे ओदिशाचे होते. प्रसन्ना साहू आणि मनोज बेहेरा अशी शहीद जवानांची नावे आहेत. या शहीद जवानांच्या कुटुंबाला ओदिशा सरकारने प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी याबाबतची घोषणा केली.

वाचा : पुलवामा हल्ला : कुणी सुट्टी संपवून परतलं होतं, तर कुणाचं लग्न ठरलं होतं

झारखंड :

झारखंडचे जवान विजय सोरेंगे हेदेखील या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी शहीद जवान विजय सोरेंगे यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत आणि नातेवाईकांपैकी एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली.

हिमाचल प्रदेश :

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या हल्ल्यात शहीद झालेले जवान तिलक राज यांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तराखंड

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले. तसेच कुटुंबातील एका व्यक्तिला त्याच्या योग्यतेनुसार सरकारी नोकरी देण्यात येईल अशी घोषणा केली.

त्रिपुरा :

त्रिपुरा सरकारने शहीदांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली.

संबंधित बातम्या :

Pulwama Attack: माझा शब्द आहे, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ : मोदी

Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी 

Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण? 

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचुप

VIDEO :