मिठाईवर ‘तयार करण्यात आलेली तारीख’ आणि ‘एक्सपायरी डेट’ दोन्हीही तारखा आवश्यक : अन्न-औषध प्रशासन मंत्री

| Updated on: Nov 13, 2020 | 8:05 AM

दिवाळीत तयार होत असलेली मिठाई तसेच अन्य खाद्य पदार्थ जे विकले जातात त्यावर ते तयार करण्याची तारीख आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख (एक्सपायरी डेट) या दोन्ही तारखा असणे बंधनकारक आहे, असे आदेश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.

मिठाईवर तयार करण्यात आलेली तारीख आणि एक्सपायरी डेट दोन्हीही तारखा आवश्यक : अन्न-औषध प्रशासन मंत्री
Follow us on

मुंबई : दिवाळीत तयार होत असलेली मिठाई तसेच अन्य खाद्य पदार्थ जे विकले जातात त्यावर ते तयार करण्याची तारीख आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख (एक्सपायरी डेट) या दोन्ही तारखा असणे बंधनकारक आहे, असे आदेश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. (Sweets for sale on Diwali require ‘date of manufacture’ and ‘expiry date’ both FDA Minister Rajendra Shingane)

जनतेला सकस आणि चांगले अन्न दिवाळीच्या काळात मिळाले पाहिजे याकडे पूर्णपणे लक्ष देण्यात येत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण बाबींवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांची दिवाळी सुरक्षित साजरी व्हावी यासाठी शासन दक्ष आहे, असं मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.

सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मोठी मागणी असते. मात्र काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थ्यांची विक्री करुन नागरिकांच्या जीवाशी खेळत असतात. अशा समाजकंटकांवर देखील अन्न आणि ओषध प्रशासन लक्ष ठेवून आहे, असंही शिंगणे यांनी सांगितलं.

ग्राहकांनी देखील मिठाई घेताना तयार करण्याची तारीख आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख (एक्सपायरी डेट) या दोन्हीही तारखा आहेत की नाहीत, याची खात्री करुन घ्यावी. शेवटी ग्राहक म्हणून आपला तो अधिकार आहे, असंही शिंगणे म्हणाले.

संपूर्ण जगावर, देशावर आणि राज्यावर कोरोना महामारीचे संकट असून अजूनही ते संकट पूर्णपणे टळलेले नाही. मार्च महिन्यापासून आतापर्यंत सर्वधर्मियांनी सण अतिशय शांततेने आणि घरातच साजरे केले. दिवाळीसुद्धा प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

(Sweets for sale on Diwali require ‘date of manufacture’ and ‘expiry date’ both FDA Minister Rajendra Shingane)

संबंधित बातम्या

मंत्री राजेंद्र शिंगणे यांची मेडिकलवर धाड, ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी धडक

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे