AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला काश्मीरसह इतर कोणत्याही देशातील मुस्लिमांच्या अधिकारासाठी आवाज उठवण्याचा अधिकार : तालिबान

अफगाणिस्तानवरील तालिबानचा ताबा भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तालिबान कट्टरतावादी संघटना असून सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानचा वापर भारतविरोधी दहशतवादी कुरापतींसाठी होण्याची शक्यता आहे. तालिबानच्या भूमिकांवरुन आता तालिबानचाही रोख काहीसा स्पष्ट होतोय.

आम्हाला काश्मीरसह इतर कोणत्याही देशातील मुस्लिमांच्या अधिकारासाठी आवाज उठवण्याचा अधिकार : तालिबान
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 03, 2021 | 4:16 PM
Share

काबुल : अफगाणिस्तानवरील तालिबानचा ताबा भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तालिबान कट्टरतावादी संघटना असून सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानचा वापर भारतविरोधी दहशतवादी कुरापतींसाठी होण्याची शक्यता आहे. तालिबानच्या भूमिकांवरुन आता तालिबानचाही रोख काहीसा स्पष्ट होतोय. आता तालिबानचा प्रवक्त सुहैल शाहीनने आपल्या एका मुलाखतीत अफगाणिस्तानला काश्मीरसह जगात कुठेही मुस्लिमांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार असल्याचं मत व्यक्त केलंय. त्यामुळे तालिबान येणाऱ्या काळात काश्मीरसारख्या द्विपक्षीय मुद्द्यातही हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तवली जातेय. असं असलं तरी शाहीनने तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानचं धोरण कोणत्याही देशाविरुद्ध हत्यार उचलण्याचं नाही, असंही नमूद केलंय.

तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन म्हणाला, “मुसलमान असल्यानं आम्हाला काश्मीर, भारत आणि कोणत्याही इतर देशातील मुस्लिमांच्या अधिकारासाठी आवाज उठवण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचा आवाज उठवू. आम्ही सांगू की मुस्लीम तुमचे स्वतःचे लोक आहेत, तुमचे स्वतःचे नागरिक आहेत. त्यांना देखील तुमच्या कायद्यानुसार समान अधिकाराचा हक्क आहे.” सुहैल शाहीन बीबीसी उर्दुला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अफगाणचा वापर दहशतवादासाठी व्हायला नको, भारताची भूमिका

विशेष म्हणजे तालिबानकडून याआधी काश्मीरबाबत वेगळी प्रतिक्रिया आली होती. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवल्यानंतर काश्मीरचा मुद्दा द्विपक्षीय आणि अंतर्गत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता तालिबानने आपली भूमिका बदललेली दिसत आहे. याला पाकिस्तानचीही फूस असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचा तालिबानवर बराच प्रभाव आहे. त्यामुळे तालिबान पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच भारताला अफगाणचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊनच भारत तालिबानसोबत चर्चा करत असताना अफगाणचा वापर दहशतवादी कारवायांसाठी नको, अशी भूमिका घेत आहे.

भारत आणि तालिबानमध्ये चर्चेला सुरुवात

भारतीय राजदूत आणि तालिबानमध्ये आता सार्वजनिकपणे अधिकृत चर्चेला सुरुवात झालीय. कतारमध्ये भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी मंगळवारी (31 ऑगस्ट) तालिबानचा वरिष्ठ नेता शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजईची भेट घेतली होती. यावेळी भारताने अफगाणिस्तानचा वापर भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी होण्याची काळजी व्यक्त केली. तसेच अशा कोणत्याही कारवाईसाठी तालिबान नियंत्रित अफगाणचा वापर होऊ नये, अशी मागणी केली.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची तैनाती वाढवली

अफगाणिस्तानवरील तालिबानचं नियंत्रण भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे. अफगाण दहशतवादी कारवायांचं केंद्र बनू नये, यासाठी भारताचे प्रयत्न आहेत. एखाद्या कट्टरतावादी संघटनेकडे संपूर्ण देशाची सूत्रं असणारा हा पहिला देश आहे. याआधी इतिहासात ISIS आणि अल कायदाने देखील असे स्वतंत्र देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र या संघटना अपयशी ठरल्या. मात्र, तालिबान याबाबत बऱ्याच अंशी यशस्वी ठरलाय. आता सुन्नी आणि वहाबी दहशतवादी संघटना देखील अफगाणिस्तानचा आसरा घेऊ शकतात, अशी शक्यता आहे. असं झाल्यास भारतासाठी हे चिंतेचं कारण असेल. म्हणूनच भारत जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतो.

हेही वाचा :

TV9 Impact : अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारताच्या लेकीला पाठवायला सासरचे तयार, लवकरच मायदेशी येणार

Photos : महिलांना पूर्ण स्वातंत्र्य, फॅशन आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध काबुल, तालिबानच्या आधी अफगानिस्तान कसा होता?

Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नाकी नऊ आणणारी महिला कोण?

व्हिडीओ पाहा :

Taliban spokesperson clear stand on Kashmir and India issue

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल