AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा

Palghar Rain Alert : पालघरमधील काही भागाला उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काही भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
Palghar School CloseImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 23, 2026 | 10:48 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरातही पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहेत. ठाणे आणि पालघरच्या काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता पालघरमधील काही भागाला उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काही भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या दोन तालुक्यांमधील शाळांना सुटी जाहीर

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या तालुक्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील अंगणवाड्यांसह विद्यालये आणि महाविद्यालयांना उद्या 24 तारखेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं असून पश्चिम किनारपट्टीसह पालघर, डहाणू, तलासरी भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिंचणी पोसरे तलाव येथील 70 नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित स्थळी हलवलण्यात आले. मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, कासा, मनोर, मासवन, नागझरी, वाणगाव भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे बहुमतांशी रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

पुराच्या पाण्यात अडलकेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

मुसळधार पावसामुळे तलासरी तालुक्यातील कोचाई गावातील काळू नदीला आलेला पुरामुळे आवरपाडा ,वाळवी पाडा येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यांना स्थानिक तरुणांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या 30 ते 35 लोकांना सुरक्षित बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

Follow Us
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती