Maharashtra News LIVE : लालबागच्या राजाला दान आलेल्या मौल्यवान वस्तूंचा लिलाव होणार
Maharashtra News LIVE : निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांकडून देशभरात आंदोलनाचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच राज्यात दुष्काळाची स्थिती आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
आधार’ नाही तर कोणतीच दस्त नोंदणीसाठी नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वपूर्ण निर्णय
आधार’ नाही तर कोणतीच दस्त नोंदणीसाठी नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वपूर्ण निर्णय समोर आला आहे. आता आधार ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. मालमत्ता खरेदी विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय झाला आहे. खोटे साक्षीदार, खोटे पक्षकार उभे करून होणारी फसवणूक आता हद्दपार होणार आहे. खरेदी, विक्री, बक्षीस, गहाण, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. हा निर्णय एक ऑक्टोबर पासून निर्णय लागू होआर असून शासनाचे राजपत्र जारी झाले आहे.
-
लालबागच्या राजाला दान आलेल्या मौल्यवान वस्तूंचा लिलाव होणार
गणेशोत्सवात लालबागचा राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा आज लिलाव करण्यात येत आहे. लालबागच्या राजाला यंदा एका अज्ञात भाविकांने एक किलो २४ कॅरेटचे सोन्याची वीट अर्पण केली आहे. या सोन्याची वीट ची किंमत १ कोटी ४८ लाख रुपये आहे. तर एका अज्ञात भाविकाने १८ कॅरेट सोन्याची १४१ ग्रॅम वजनाची गणेश मूर्ती अर्पण केली आहे. या गणेश मूर्ती ची किंमत १५ लाख ६५ हजार रूपये आहे. तसेच अनेक सोन्याचे दागिने, मोदक, चांदीच्या गदा, क्रिकेटच्या बॅट, आणि दोन मोटर बाईक लिलावाचे मुख्य आकर्षण आहेत… लिलावातून मिळालेल्या नीधीचा उपयोग लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध समाजोपयोगी उपक्रमामध्ये वापरतात. यामध्ये सर्वाधीक नीधी वैद्यकीय उपचारांसाठी मदत करण्यासाठी वापरण्यात येतो.
-
-
अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच वातावरण तापलं
अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच वातावरण तापू लागलं आहे. संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड प्रक्रियेसाठी सक्रिय सहभाग नोंदवला असून, आमदार संग्राम जगताप यांच्याकडून जास्तीत जास्त संचालक निवडून येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
-
खंडाळा तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
खरीप २०२६ च्या ‘Trigger-1’ अंतर्गत खंडाळा तालुक्यात महसूल व कृषी विभागामार्फत शेतावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. सर्वेक्षणात पिकांचे फोटो व जीपीएस लोकेशन नोंदवले जात असून, शासकीय अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. पुढील मदतीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खाते, आयएफएससी कोड आणि फार्मर आयडी तयार ठेवावा, असे आवाहन तहसीलदार रविराज जाधव यांनी केले आहे.
-
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजपचा मदतीचा हात
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजपचा मदतीचा हात
मीरा-भाईंदरमध्ये निधी संकलन मोहीम
महापालिकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीत १ कोटी रुपये देण्याचा निर्णय
नागरिक, उद्योजक, संस्था आणि गणेश मंडळांना मदतीचे आवाहन
जास्तीत जास्त निधी उभारण्यासोबतच एखादे गाव दत्तक घेण्याचाही विचार
-
-
कापूरबावडी पोलीस स्टेशन बाहेर मोठा जमाव
पूर्णेकर समर्थकांना आणि कुटुंबीयांना पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या गेटवरच अडवले. जोपर्यंत मुख्य आरोपींना अटक करणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी पूर्णेकर कुटुंबीयांची भूमिका. कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. थोड्याच वेळात पूर्णेकर यांचा मृतदेह जे जे रुग्णालयातून ठाण्यात आणण्यात येणार.
-
ईडीच्या मुंबई झोनकडून 8 ठिकाणी छापेमारी
डॉ. धर्मेंद्र कुमार आणि इतरांविरोधात सुरू असलेल्या बनावट CSR डोनेशन रॅकेट प्रकरणात ईडीच्या मुंबई झोनच्या पथकाकडून आठ ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच, पश्चिम बंगालमधील १, गुजरातमधील १ आणि दिल्ली-एनसीआरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान मार्केट ऑपरेटर, ट्रस्टी आणि मध्यस्थांच्या ठिकाणांची झडती घेतली जात आहे. प्राथमिक तपासात शेकडो कोटी रुपयांच्या बनावट CSR रॅकेटचा खुलासा झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
-
अशोक खरात याला 3 दिवसाची पोलीस कोठडी
सरकार वाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात भोंदू बाबा अशोक खरात याला 3 दिवसाची पोलीस कोठडी. शुक्रवारी अशोक खरात याला पुन्हा करणार न्यायालयात हजर.
-
पुणे महानगरपालिकेत बनावट नोकर भरती घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई
बनावट नोकर भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार राजेंद्र खेडेकर याला अटक. शिवाजीनगर पोलिसांकडून राजेंद्र खेडेकर यांच्यासह त्यांच्या साथीदार यांच्याविरोधात अनेक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल. गेल्या दोन महिन्यांपासून राजेंद्र खेडेकर फरार होता. पोलिसांनी अखेर त्याला काल अटक केली. राजेंद्र खेडेकर याला पोलिसांनी कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
-
सचिन वाझेच्या जामिनाला 7 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती
माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामिनाला 7 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सचिन वाझे आज तुरुंगातून बाहेर पडणार नाही. 7 ऑक्टोबरपर्यंत त्याचा तुरुंगातच मुक्काम राहणार आहे.
-
आमदार रोहित पवार आज धुळे जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर
आमदार रोहित पवार आज धुळे जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात शिंदखेडा तालुक्यातील धावडे-अंजनविहीर आणि शेवाडे या गावांपासून होणार असून, त्यानंतर धुळे तालुक्यातील चिंचवार आणि निमडाळे येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेणार आहेत. धुळे दौऱ्यानंतर ते चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा, तरवाडे आणि करजाई येथेही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत
-
पुणे शहर युवक काँग्रेसकडून महापालिका गेटसमोर आंदोलन
पुणे महानगरपालिका आयुक्तांना कथितरित्या देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ पुणे शहर युवक काँग्रेसकडून महापालिका गेटसमोर आंदोलन करण्यात येत आहे. सुमारे ९० कोटी रुपयांच्या रस्ते निविदेवरून सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने आयुक्तांना अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे.
-
दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात
दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. पारदर्शक मतदार यादी, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरने मतदान, नवमतदारांसाठी फॉर्म ६ च्या जाचत अटी रद्द करणे, निवडणूक आयोगाचं उत्तरदायित्व निश्चित करणे, या इंडिया आघाडीच्या प्रमुख मागण्या आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही बैठकीत मागणी करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित आहेत.
-
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्वतःसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला राम शिंदे अनुपस्थित होते, मात्र सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना टोला लगावत, “सुजय विखे बैठकीला होते, मात्र पालकमंत्र्यांना माहिती नव्हती,” अशी टिप्पणी केली. सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्यात प्रथमदर्शनी मतभेद असल्याचं दिसत असल्याचंही शिंदे म्हणाले. तसेच संगमनेरमधील बैठकीबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी समोर येऊन भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन राम शिंदे यांनी केलं.
-
प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ‘रंग रास नवरात्री २०२६’चा भव्य सोहळा
प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ‘रंग रास नवरात्री २०२६’चा भव्य सोहळा रंगणार आहे. ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान भूमी त्रिवेदी यांच्या संगीतावर गरबा रसिक थिरकणार आहेत. बोरिवली पश्चिमेतील अडे बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानात दररोज सायंकाळी ७ वाजल्यापासून कार्यक्रम होणार आहे. १.५ लाख चौरस फुटांचे गरबा फ्लोअरिंग, भव्य रोषणाई, सजावट आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
-
नाशिक- स्पर्धा परीक्षांमधल्या त्रुटी सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समितीचा संवाद
नाशिक- स्पर्धा परीक्षांमधल्या त्रुटी सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समितीचा संवाद सुरू आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत संवाद सुरू आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये गोंधळानंतर राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली होती. अप्पर मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा यांच्या समितीसोबत विद्यार्थ्यांचा संवाद सुरू आहे. संवाद कार्यक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची कसून तपासणी करण्यात आली.
-
दुष्काळ पार्श्वभूमीवर सिमेंट रस्त्यांच्या कामांना ब्रेक देण्यात आला- सूत्र
दुष्काळ पार्श्वभूमीवर सिमेंट रस्त्यांच्या कामांना ब्रेक देण्यात आला आहे. सिमेंट रस्त्यांच्या कामाला मर्यादा आणण्याचे आदेश देण्यात आल्याचे आदेश सूत्रांनी दिले आहेत.
-
सायन कोळीवाड्यात वारंवार वीज गुल
सायन कोळीवाड्यात वारंवार वीज गुल. संतप्त नागरिकांचे अणिक बस आगार परिसरात आंदोलन. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक रस्त्यावर. सायन कोळीवाड्यात विजेचा लपंडाव सुरूच. वीज समस्येने सायन कोळीवाड्यातील नागरिक त्रस्त संताप व्यक्त करत आंदोलन. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
-
निफाड तालुक्यातील लासलगावसह ४६ गावे दुष्काळी यादीतून वगळल्याने शेतकरी संतप्त…
निफाड तालुक्यातील लासलगावसह ४६ गावे दुष्काळी यादीतून वगळल्याने शेतकरी संतप्त…लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांची सरकारविरोधी निर्णयाच्या विरोधात बैठक… ४० ते ४५ दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिके करपल्याचा शेतकऱ्यांचा दावा…द्राक्ष, डाळिंब बागांवरही संकट…ट्रिगर १ मध्ये निफाड तालुक्याचा समावेशाची मागणी…लासलगावसह ४६ गावांचा दुष्काळी यादीत समावेश न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा…बैठकीनंतर शेतकऱ्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी…
-
जळगावत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपविले
जळगावच्या जामनेर तालुक्यात एकुलती येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपविले. पती आणि सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घराच्या मागील विहिरीत उडी घेत जीवन संपविले. जिजाबाई देवानंद सकट असे ३५ वर्षीय मयत महिलेचे नाव आहे..किरकोळ कारणावरून वारंवार पतीने आणि सासऱ्याने विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल. देवानंद युवराज सकट, युवराज सुकदेव सकट असे गुन्हा दाखल झालेल्या पती आणि सासऱ्याची नावे
-
सचिन वाझेचा जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टाचा नकार
सचिन वाझेचा जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टाचा नकार दिला आहे. सचिन वाझेचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
Cjpच्या स्तावित आंदोलनाला परवानगी देऊ नका-गर्जना संघटनेचे प्रशासनाला पत्र
Cjp च शिवाजी पार्कवरील २ ऑक्टोबरच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी देऊ नका, गर्जना संघटनेचे प्रशासनाला पत्र. गर्जना संघटनेची मुंबई पोलिसांकडे धाव. २ ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये आंदोलन झाल्यास न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन होण्याची भीती. गर्जना संघटनेचा इशारा. गर्जना संघटनेचे मुंबई पोलिसांना निवेदन
-
मिरा भाईंदर उत्तन मच्छिमारांची मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी
मिरा भाईंदर उत्तन मच्छिमारांच्या डिझेलच्या वाढत्या दराचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली. मनोरी येथील प्रस्तावित खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या प्रकल्पाच्या संभाव्य परिणामांवर चर्चा करण्यात आली. जलप्रकल्पामुळे समुद्र, मत्स्यव्यवसाय, शेती आणि मच्छिमारांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा मांडण्यात आला. दोन्ही प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्याचे मंत्र्यांनी आश्वासन दिले.
-
पिंपरी- चिंचवडमध्ये अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या अफगाणिस्तानी नागरिकांवर कारवाई
पिंपरी- चिंचवडमध्ये अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या अफगाणिस्तानी नागरिकावर एटीबीने कारवाई केली. 26 वर्षीय डायनेर हुसेन हा अफगाणिस्तानचा नागरिक असून विद्यार्थी व्हिसावर भारतात आला होता. मात्र, त्याचा रेसिडेन्शियल परमिट जानेवारी २०२६मध्येच संपला होता. त्यानंतरही तो बावधन परिसरात राहत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. एटीबी आणि एफआरओच्या पथकाने बावधन पोलिसांच्या मदतीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. डिपोर्टेशनची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परदेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्यास पोलिसांना माहिती देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
-
मंत्री दादा भुसे मालेगाव न्यायालयात दाखल
मंत्री दादा भुसे मालेगाव न्यायालयात दाखल…मालेगावच्या डोंगराळे खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मंत्री भुसे न्यायालयात. आज डोंगराळे खटल्याची अंतिम सुनावणी.. 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून करण्यात आली होती हत्या..घटनेने मालेगावात उसळला होता जनक्षोभ…
-
इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला अगदी थोड्याच वेळात सुरुवात
इंडिया आघाडीची थोड्याच वेळात दिल्लीत बैठक असणार आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे बैठकीला उपस्थित असणार आहे. ममता बॅनर्जी आणि कपिल सिब्बलही या बैठकीला पोहोचले आहेत.
-
SIR नोंदणीबाबत मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश
SIR नोंदणीबाबत मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश आहेत. Whatsapp वरील पुरावे ग्राह्य धरा असं मुख्य निवडणुक अधिकारी चोकलिंगम म्हणाले आहेत.
-
सांगली दुष्काळी पंचनाम्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी मैनाक घोष शेतात
सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांत खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 लागू झाला आहे. या अनुषंगाने संबंधित तालुक्यात पिकांचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीक पंचनामे अचूक व वस्तुनिष्ठ करून, पंचनाम्याची कार्यवाही दहा दिवसात प्राधान्याने व जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी स्वतः कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान निदर्शनास आले. पिकाखालील क्षेत्राची नोंद, मशागत, पेरणी, खते, बियाणे व मजुरी आदिंसाठी झालेला खर्च आणि कमी पावसामुळे सध्या पिकांची वाढ खुंटली असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. कमी पावसामुळे ओलाव्याअभावी पीक सुकल्याचे नमूद करण्यात आले आहे. -
मनोरुग्ण म्हणत राहुल गांधीविरोधात भाजपाच्या जोरदार घोषणा सुरु
मनोरुग्ण म्हणत राहुल गांधीविरोधात भाजपाच्या जोरदार घोषणा सुरु आहेत. नागपुरातील आंदोलनात आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना त्याचा परिणाम आता तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या यात्रेवर आणि स्थानिक व्यापारावरही जाणवू लागला आहे.सप्टेंबर महिन्यातही उन्हाची तीव्रता कायम असल्याने तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भवानी रोडवर नेटची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे बाहेरगावाहून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे.भाविकांची संख्या घटल्याने व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसू लागला आहे. येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी ही व्यापारी करत आहेत.
-
राहुल गांधी यांचे फोटो आणि बॅनर घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले
राहुल गांधी यांचे फोटो आणि बॅनर घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत, तर आंदोलकांनी राहुल गांधीचा प्रतिकात्मक पुतळा आणला आहे.
-
राहुल गांधीविरोधात भाजपाचे नागपुरात आंदोलन सुरु
राहुल गांधीविरोधात भाजपाचे नागपुरात आंदोलन सुरु आहे. भाजप युवा मोर्चाचे राहुल गांधीविरोधात आंदोलन सुरु असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. तर राहुल गांधी हे मनोरुग्ण आहे असा आरोप आंदोलक करत आहेत.
-
राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा
राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा… शिक्षक मतदारांची नोंदणी अपूर्ण असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे असं सचिन सानप म्हणाले. गेल्या निवडणुकीत कोरोनाचा काळ असून देखील मतदार जास्त होते मात्र या निवडणुकीत शिक्षक मतदारांची संख्या घटली: सचिन सानप यांची माहिती. सर्व पक्षांची संवाद साधला असून शिक्षक असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे. मी देखील शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे.
-
ठाकरे बंधू यांच्या मोर्चात काँग्रेस नेते सहभागी होण्याची शक्यता कमी-नाना पटोले
निवडणूक आयुक्तांविरोधात कॅाग्रेस मुंबईत वेगळा राज्यव्यापी मोर्चा काढण्याची तयारी. आज दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत मुंबईतील मोर्चाबाबत अंतीम निर्णय त्यामुळे चार तारखेला ठाकरे बंधू यांच्या मोर्चात काँग्रेस नेते सहभागी होण्याची शक्यता कमी असे नाना पटोले म्हणाले.
-
ज्ञानेश कुमार आणि नरेंद्र मोदी यांचा राजीनामा झालाच पाहिजे-नाना पटोलो
ज्ञानेश कुमार आणि नरेंद्र मोदी यांचा राजीनामा झालाच पाहिजे, मुंबईत आंदोलन करु, इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ असे नाना पटोलो म्हणाले आहेत.
-
इंडिया आघाडीची थोड्याच वेळात दिल्लीत बैठक
इंडिया आघाडीची थोड्याच वेळात दिल्लीत बैठक होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड पोहोचले असून, शरद पवार आणि उद्धव ठाकरे VC द्वारे उपस्थिती दर्शवणार आहे.
-
पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीमधील पायाभूत सुविधांचा अभाव
रस्ते, पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने, येथील अनेक मोठे उद्योग स्थलांतराच्या मार्गावर असल्याची घोषणा केली होती यानंतर राज्य सरकारने या समस्येची दखल घेत १४०० कोटी रुपयांचा नवीन विकास आराखडा मंजूर केला आहे. मात्र, एक महिन्यात सकारात्मक बदल दिसून येत असला तरी शासनाने दिलेल्या १० महिन्यांच्या मुदतीत ही कामे पूर्ण न झाल्यास उद्योग स्थलांतरित करण्याचा विचार करावा लागेल असा थेट इशारा उद्योजकांनी ‘दिला आहे. उद्योगमंत्र्यांची नियोजित बैठकही अचानक रद्द झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. येथील वीज गळती, पाण्याची टंचाई आणि ट्रॅफिकच्या समस्येवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. यावेळी चाकण फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज चे चेअरमन दिलीप बटवाल उद्योजक धनंजय शेडबाळे आणि ट्रॅफिक चळवळीचे कुणाल कड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनिल थिगळे यांनी
-
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट
राष्ट्रवादीचे पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र मेळाव्यात बोलवल्यानंतर त्याच मेळाव्याला भाजपचे पदाधिकारी उपस्थित लावणार आहेत. पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला लागले का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
-
अरबी समुद्रात भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई
गुजरात ATSच्या मदतीने भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई. लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात संशयित इराणी धाऊचा पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली. ५२६ किलो हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ३ हजार कोटींहून अधिक आहे.
-
ठाणे शहर गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे- संजय राऊत
प्रदीप पूर्णेकर हे ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिक होते. ठाणे शहर गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. राज्यातील गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे असे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
-
फडणवीस सरकारच्या बाबतीत प्रचंड चीड- नाना पटोले
आमच्याकडे आता सर्व गोष्टी आहेत. शासनाकडे माहीती आहे तरी सरकार पंचनामे करण्यात वेळ घातवलाय कर्नाटक सरकारने मदतही वितरीत केली. शेतकरी जीवन संपवतोय. फडणवीस सरकारच्या बाबतीत प्रचंड चीड आहे सरकारने तातडीने मदत दिली नाही असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
-
MPSC विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये आज चर्चा
एमपीएससीच्या आयोगाच्या अध्यक्षाच्या राजीनाम्यावर ठाम असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार. आज होणाऱ्या शिष्टमंडळाची आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेवर दोन आक्टोंबर चा आंदोलनाची दिशा ठरणार
-
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीतच घमासान
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीतच घमासान सुरू आहे. भाजपच्या दोन गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची वेगवेगळी भेट घेतली आहे. खासदार अनिल बोंडे यांचे नेतृत्वात एक गट तर रविराज देशमुख यांच्या नेतृत्वात दुसरा गट आहे. अमरावतीत भाजपमध्ये गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अमरावती मतदारसंघ शिंदे सेनेकडे जाणार हे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
-
अमरावती जिल्हात दुष्काळाने सोयाबीन हिरावले, आता कपाशीही धोक्यात
अमरावती जिल्हात दुष्काळाने सोयाबीन हिरावले, आता कपाशीही धोक्यात आली आहे. नादुरुस्त रोहित्रांमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळेना. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कपाशीला पाणी दिले नाही तर जगायचे कसे? अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी मधील विद्युत रोहीत्र नादुरुस्त झाले आहे.
-
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचे आवाहन
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे. त्यांनी सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे. जीआरमध्ये तरतूद नसली तरी सामाजिक बांधिलकीतून मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. दुष्काळग्रस्त कुटुंबातील लग्न अडू नये, यासाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन केले.
-
रोहित पवार-दादा भुसे एकाच मंचावर
नाशिकमद्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळ्यासाठी आमदार रोहित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. जयंती सोहळ्या निमित्त मॅरेथॉन चौकातून शोभायात्रा काढली जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या २८ शाळांतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होईल. कर्मवीरांच्या जीवनप्रवासाचे दुर्मिळ छायाचित्रांतून दर्शन घडवले जाणार आहे.
-
अधिकारी, कर्मचारी रजेवर गेल्यास गुन्हे दाखल होणार-जिल्हाधिकारी
सोलापुरात दुष्काळी स्तिथीत अधिकारी, कर्मचारी विनाकारण रजेवर गेल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत. दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील दुष्काळाच्या उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसाठी आदेश काढले आहेत. महसूल, कृषी, ग्रामविकास आणि जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांसाठी आदेश देण्यात आले आहेत.
-
नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मोठे आवाहन
दुष्काळी परिस्थितीच्या धर्तीवर विमा कंपनी आणि शासनाच्या तांत्रिक निकषानुसार मदत मिळण्यासाठी वस्तूनिष्ठ पीक कापणी प्रयोग होणे गरजेचे आहे. पीक कापणी प्रयोगासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पिकांची कापणी, काढणी किंवा शेताची नांगरणी करू नये. पीक कापणी प्रयोगाला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे महत्वपूर्ण आवाहन केले आहे. पीक विम्याची भरपाई आणि प्रत्यक्ष नुकसान निश्चितीसाठी पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. दुष्काळाने पीक पूर्ण करपली असल्यास शून्य उत्पादन पंचनामा होईल,त्यामुळे पीक पूर्णपणे नष्ट झाले तरी घाईने पीक काढू नये, असे आवाहन त्यांनी केले.
-
अमेरिकेत बनावट ‘ओझेंपिक’ औषधांची विक्री; दोन भारतीय नागरिकांविरोधात गुन्हा
अमेरिकेत बनावट ‘ओझेंपिक’ औषधांची विक्री आणि तस्करी केल्याच्या आरोपावरून दोन भारतीय नागरिकांविरोधात फ्लोरिडातील फेडरल न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नदीप रॉय आणि विकी रामंचा या दोघांवर अमेरिकेतील वितरकांना अत्यंत कमी किमतीत बनावट ‘ओझेंपिक’ औषधे विकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी स्वप्नदीप रॉयला इटलीतून अमेरिकेत प्रत्यार्पित करण्यात आले असून, मंगळवारी त्याला फ्लोरिडातील टँपा न्यायालयात हजर करण्यात आले.
-
कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातून दिवसाढवळ्या रिक्षा चोरी; घटना CCTV मध्ये कैद
कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात भरदुपारी रिक्षा चोरीची घटना समोर आली आहे. महालक्ष्मी हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला उभी केलेली रिक्षा चोरट्याने लॉक आणि वायर तोडून पळवून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून महात्मा फुले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या रिक्षा चोरी झाल्याने रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
-
मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीवर अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कारवाई केली
मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीवर अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कारवाई केली आहे. खार पश्चिम येथील 13 क्रॉस, 19 रोड परिसरात गस्तीदरम्यान पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळून आली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 3 किलो 60 ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत 9 कोटी 9 लाख 90 हजार रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने ही कारवाई केली.
-
मुंबईत सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात मागे घेण्याची मागणी
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं 97 टक्के भरल्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र सध्या धरणात असलेलं पाणी पुढील वर्षी मे महिन्याच्या मध्यापर्यंत पुरू शकतं. त्यानंतर राखीव साठ्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. मात्र राज्याच्या इतर भागातील दुष्काळाचा विचार पाणीकपात मागे घेण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून घेतला जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत पालिका सभागृहात याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला. यासोबतच विद्यार्थ्यांची फीस देखील बोर्डाने माफ केली. एल निनोचा मोठा प्रभाव राज्यात बघायला मिळतोय. 2027 मध्ये एल निनोचे संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यातच परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालणार आहे. हवामान विभागाने तसा इशारा देखील दिला. पुणे शिक्षक मतदार संघानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदार संघाचीही मागणी. पुणे पदवीधर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर इच्छुक. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली. भाऊसाहेब आंधळकरांनी यापूर्वी शिवसेनेकडून बार्शी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Published On - Sep 30,2026 8:22 AM
