काबुल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अडकलेल्या भारताची लेक हिना प्रकरणी टीवी9 च्या अभियानाचा परिणाम दिसू लागलाय. हिना मायदेशी परतण्याची आशा पल्लवित झालीय. अफगाणिस्तानमधून विमानसेवा सुरू झाल्यानंतर लगेचच हिनाला भारतात आणलं जाणार आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिलीय. दुसरीकडे दबाव वाढल्यानंतर अफगाणिस्तानमधील हिनाच्या सासरच्या लोकांनीही तिला माहेरी पाठवण्याची तयारी दाखवली आहे. हिनाने आपली आई आणि भावाला फोन करुन ही माहिती दिली. विशेष म्हणजे सासरचे लोक हिनाला तिच्या मुलासह भारतात पाठवण्यास तयार झालेत.