आता चहा भाव खाणार, तुम्हाला रिफ्रेश करणारा चहा महागणार?

| Updated on: Jun 17, 2019 | 6:30 PM

चहा उद्योगाला देशात हवी तेवढी चालना मिळत नसल्याचं दिसून येतं. याचं कारण म्हणजे चहाची किमान मूळ किंमत निश्चित नसणे. चहाची किमान मूळ किंमत निश्चित नसल्याने बाजारात चहाच्या विक्रीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते.

आता चहा भाव खाणार, तुम्हाला रिफ्रेश करणारा चहा महागणार?
Follow us on

मुंबई : देशातच नाही तर जगभरात चहाचं वेड पाहायला मिळतं. सकाळी झोपेतून उठलं की सर्वात आधी कुठल्या गोष्टीची गरज वाटत असेल तर तो म्हणजे चहा. त्यातच भारतातील चहाची चव ही जगभरात प्रसिद्ध आहे. तरीही चहा उद्योगाला देशात हवी तेवढी चालना मिळत नसल्याचं दिसून येतं. याचं कारण म्हणजे चहाची किमान मूळ किंमत निश्चित नसणे. चहाची किमान मूळ किंमत निश्चित नसल्याने बाजारात चहाच्या विक्रीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. त्यामुळे देशातील चहाचं उत्पादन आणि विक्री पाहता चहा महागणार असल्याची शक्यता टी-बोर्डाने वर्तवली आहे.

वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येत असलेलं चहा बोर्ड सध्या चहाचं किमान मूळ किंमत ठरवण्याच्या विचारात आहे. चहा व्यापाऱ्यांकडून अनेक काळापासून ही मागणी जोर धरत होती. चहाच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी सरकारने एक निश्चित किंमत ठरवण्याचा गरज आहे. यामुळे या उद्योगाला चालना मिळेल आणि निर्यातही वाढेल. भारतात होणारा चहा हा देशासोबतच विदेशातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. त्यामुळे याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. देशात चहाची विक्री ही दरवर्षी 2.2 टक्क्यांनी वाढते आहे, अशी माहिती भारतीय चहा संघ (आईटीए)ने सांगितलं.

उत्पादकांची मागणी काय?

चहाचा एमएसपी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक काळापासून लहान उत्पादकांकडून करण्यात येत होती. कारण या लहान उत्पादकांना नेहमी मोठ्या उत्पादकांवर अवलंबून राहावं लागतं. स्मॉल टी ग्रोअर (STG) यांचं देशातील एकूण चहा उत्पादनात 35 टक्के योगदान आहे. यांना चहावर प्रक्रिया होण्यासाठी या लहान उत्पादकांना मोठ्या उत्पादकांवर अवलंबून राहावं लागतं.

देशात 2.5 लाख लहान चहा उत्पादक आहेत. चहा उत्पादकांना प्रती किलोमागे 15 ते 18 रुपये खर्च येतो. तर मोठ्या उत्पादक यांच्याकडून 7-14 रुपये प्रती किलोच्या भावानो चहा विकत घेतात, अशी माहिती भारतीय लघू चहा उत्पादक संघाचे (CISTA) अध्यक्ष बिजॉय गोपाल चक्रवर्ती यांनी दिली.

चहाच्या किंमती वाढणार

2019 मध्येही चहाचं उत्पादन गेल्या वर्षी इतकंच राहण्याची शक्यता आहे. मात्र, यावर्षी चहाच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चहाच्या किमतीत वाढ व्हायला हवी. डिसेंबरमध्ये फेब्रुवारी दरम्यान चहाच्या उत्पादनात 2.5 कोटी किलो ग्रामने घट झाली होती, असं चहा बोर्डाच्या चहा प्रोत्साहन विभागाचे संचालक एस. सौंदराराजन यांनी सांगितलं.

भारताने 2018 मध्ये 5,132.37 कोटी रुपयांच्या चहाची निर्यात कोली होती. गेल्या वर्षी देशात 135 कोटी किलोग्राम चहाचं उत्पादन झालं होतं. भारताच्या प्रमुख निर्यात बाजारांमध्ये ईराण, चीन, संयुक्त अरब अमीरात, पाकिस्तान आणि सीआईएस यांचा समावेश होतो. भारतात दार्जलिंग चहा, असम चहा, नीलगिरी चहा, कांगडा चहा, मुन्नार चहा, डूआर चहा आणि मसाला चहा हे चहाचे सात प्रमुख प्रकार आहेत.

संबंधित बातम्या :

वर्षभरात 10 लाखांपेक्षा अधिक कॅश काढण्यावर आता कर द्यावा लागणार?

एटीएममध्ये कार्ड टाकण्यापूर्वी खरचं दोन वेळा Cancel बटण दाबावं लागतं?

RBI cuts repo rate : रेपो रेटमध्ये कपात, RTGS, NEFT व्यवहारावर शुल्क नाही

लवकरच ATM मधून कितीही वेळा पैसे काढण्याची मुभा?