लवकरच ATM मधून कितीही वेळा पैसे काढण्याची मुभा?

RTGS आणि NEFT व्यवहारांवरील शुल्क पूर्णपणे कमी करण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय. डिजीटल व्यवहार वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय एटीएमवर लावण्यात येणाऱ्या विविध शुल्कांचा विचार करण्यासाठीही एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

लवकरच ATM मधून कितीही वेळा पैसे काढण्याची मुभा?

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबरी दिली आहे. RTGS आणि NEFT व्यवहारांवरील शुल्क पूर्णपणे कमी करण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय. डिजीटल व्यवहार वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय एटीएमवर लावण्यात येणाऱ्या विविध शुल्कांचा विचार करण्यासाठीही एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम म्हणजेच RTGS आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रांसफर म्हणजे NEFT च्या माध्यमातून बँका शुल्क वसूल करतात. बँकांनाही आरबीआयला शुल्क द्यावं लागतं, जे ग्राहकांकडून वसूल केलं जातं. त्यामुळे हे शुल्क इतिहासजमा करण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय. बँकांनी या निर्णयाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवून अंमलबजावणी करावी, असे आदेशही आरबीआयने दिले.

RTGS सिस्टममुळे पैसे ट्रान्सफर करण्याची सोय होते. या सिस्टमअंतर्गत तातडीने पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी ही सिस्टम वापरली जाते. याअंतर्गत किमान दोन लाख रुपये पाठवले जाऊ शकतात आणि जास्तीत जास्त कितीही पैसे पाठवता येतात. NEFT चाही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापर केला जातो. यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किमान आणि कमाल मर्यादा नाही.

एटीएमचा वापर वेगाने वाढत असल्याचं आरबीआयने म्हटलंय. शिवाय एटीएम व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कांवर विचार करण्याची मागणीही जुनी आहे. त्यामुळे आरबीआयने एक समिती नियुक्ती केली आहे. या समितीकडून ग्राहकांच्या दृष्टीने विचार करुन योग्य शिफारस केली जाईल. ही समिती पहिल्या बैठकीच्या दोन महिन्यात शिफारसी सादर करणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *