लॉकडाऊनंतर कापड उत्पादनला तेजी, कामगार वर्ग सुखावला

कापडाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे यंत्रमागधारकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Textile Fabrics Business demand After Corona Pandemic)

लॉकडाऊनंतर कापड उत्पादनला तेजी, कामगार वर्ग सुखावला
| Updated on: Nov 18, 2020 | 4:39 PM

कोल्हापूर : इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते. लॉकडाऊन उठल्यानंतर यंत्रमाग व्यवसायाला चांगले दिवस बघायला मिळत आहेत. सध्या कापडाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे यंत्रमागधारकांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे. (Textile Fabrics Business demand After Corona Pandemic)

संपूर्ण देशभरात गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाचे संकट पाहायला मिळत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले होते. कोरोना महामारी आटोक्यात आल्यानंतर हे लॉकडाऊन उठवण्यात आले. त्यामुळे यंत्रमाग व्यवसायाला गती आली आहे. सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापडाला मागणी आहे. त्यामुळे यंत्रामध्ये कारखान्यामध्ये कापड उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यापासून यंत्रमागावर आधारित असणाऱ्या कामगारांवर बेरोजगारची वेळ आली होती. पण आता यंत्रमाग व्यवसाय सुरळीत चालू असल्यामुळे यंत्रमागधारक आणि कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग कारखाने आहेत. यात मोठ्या प्रमाणात कापडाचे उत्पादन घेण्यात येत आहे. त्याशिवाय सायझिंग, प्रोसेस येथेही कापडांवर प्रक्रिया करणारे कामगारांचे काम पुन्हा सुरु झाल्याने त्यांनाही आर्थिक अडचणींपासून थोड्या प्रमाणात सुटका मिळाली आहे.

शहरातील कापड विक्रीसाठी मुंबई, गुजरात, राजस्थान, भिवंडी या ठिकाणी कापडाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच अशाप्रकारे यंत्रमाग व्यवसायाला तेजी आली तर कोरोना काळातील नुकसान भरून येण्यास मोठी मदत होणार आहे. (Textile Fabrics Business demand After Corona Pandemic)

संबंधित बातम्या : 

पहिली ट्रेन धावलेला पूल तोडणार, नायगाव-भाईंदर खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा

कोकण रेल्वे मार्गावर विचित्र अपघात, चालत्या रो-रो गाडीवरील ट्रक खाली पडला, चालकाने प्रसंगावधानाने वाचला जीव