आरक्षणाने फक्त मानसिक समाधान, फायदा काहीच नाही : मुख्यमंत्री

| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

नागपूर : आरक्षणामुळे केवळ मानसिक समाधान मिळतं. आरक्षणाचा नोकरी मिळवण्यात काहीही फायदा होत नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाले. नागपुरात आज जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा‘ या संमनेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे आणि सामाजिक कार्यकर्ते आशुतोष शेवाळकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन […]

आरक्षणाने फक्त मानसिक समाधान, फायदा काहीच नाही : मुख्यमंत्री
Follow us on

नागपूर : आरक्षणामुळे केवळ मानसिक समाधान मिळतं. आरक्षणाचा नोकरी मिळवण्यात काहीही फायदा होत नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाले. नागपुरात आज जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा‘ या संमनेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे आणि सामाजिक कार्यकर्ते आशुतोष शेवाळकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री सुशीलकमार शिंदे, ऊर्जामंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते.

आरक्षणावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

आरक्षणाचा नोकरी मिळवण्यात काहीही फायदा होत नाही. शिक्षण खासगी झालंय. त्यामुळे बऱ्याच खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाचा फायदा मिळत नाही. एकंदरीत आरक्षणामुळे फक्त मानसिक समाधान मिळतं. खऱ्या अर्थे समाजाला पुढे न्यावं लागेल. स्वतः संधी निर्माण करावी लागेल, तेव्हाच आरक्षणाचं महत्त्व कमी होईल.”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सगळ्या समाजाला आरक्षण दिलं, तरी 90 टक्के लोकांना सरकारी नोकरी मिळणार नाहीत. सरकारी नोकरी आता उपाय राहिला नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

व्हिजन डॉक्युमेंटवर काय म्हणाले मुख्यमंत्री?

“व्हिजन डाक्युमेंटमधल्या अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंभर टक्के होत नाहीत. कारण काहींची दुकानदारी बंद होत असते. त्यामुळे ते विरोध करतात. त्याचा त्रास होतो.” असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणावर होता, हे मात्र कळू शकले नाही.

स्वत: संघाच्या शाखेत गेलो : मुख्यमंत्री

माझ्या जीवनात शिक्षकांचं मोठं महत्त्व आहेय वयाच्या सातव्या वर्षी मी संघाच्या शाखेत गेलो. मला शाखेत कोणी नेलं नाही. मी स्वतः गेलो. संघ दक्षचा आडवा हात नसता, तर आता मला डोक्याला हात लावून सलाम करतात, ते मिळालं नसतं, असे संघाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.

जे संकुचित आहे, ते हिंदुत्त्व नाही : मुख्यमंत्री

“हिंदुत्त्व संकुचित असूच शकत नाही. जे संकुचित आहे, ते हिंदुत्त्व कधीच नाही. हिंदुत्वाचं व्यापक रुपच मी शिकलो आहे, असे सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “सर्व समाजात संकुचित मानसिकता निर्माण होत आहे. संकुचित मानसिकतेतून बाहेर काढावं लागेल.”

2050 पर्यंत नक्कीच मराठी माणूस पंतप्रधान होईल. तशी मराठी माणसात क्षमता आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी आशावाद व्यक्त केला.