AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचा मोठा निर्णय, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला हजर राहणार का? सर्वात मोठी बातमी

आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यापूर्वी त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुद्धा निवड करण्यात आली आहे, आता या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, एक मोठी बातमी समोर आली आहे.

शरद पवारांचा मोठा निर्णय, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला हजर राहणार का? सर्वात मोठी बातमी
sharad pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 31, 2026 | 3:00 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, त्यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? राष्ट्रवादीचा गटनेता कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली होती, या सर्व पार्श्वभूमीला कालपासून राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. शुक्रवारीच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं होतं. त्यानंतर आज सायंकाळी आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली,  या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते देखील उपस्थितीत होते, या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी देखील निवड करण्यात आली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या गोटात या सर्व घडामोडी सुरू असतानाच आज सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे, सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही, असं त्यांनी म्हटलं आहे, तसेच या संदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही पवार यांनी म्हटलं होतं, दरम्यान शरद पवार यांच्या या विधानानंतर शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.

अखेर या संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईला जाणार नाहीयेत, शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नसल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

आज शपथविधी

सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यांनी त्यापूर्वी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला आहे. तसेच त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील निवड करण्यात आली आहे. आज सायंकाळी 5 वाजता त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?