AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Case LIVE: रिया आणि सिद्धार्थ पिठानीच्या जबाबात तफावत, समोरासमोर बसवून चौकशी होणार

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आज (30 ऑगस्ट) सीबीआयचा मुंबईत तपासाचा दहावा दिवस आहे. तर रियाच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे (Rhea Chakraborty CBI inquiry).

Sushant Case LIVE: रिया आणि सिद्धार्थ पिठानीच्या जबाबात तफावत, समोरासमोर बसवून चौकशी होणार
| Updated on: Aug 30, 2020 | 4:22 PM
Share

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आज (30 ऑगस्ट) सीबीआयचा मुंबईत तपासाचा दहावा दिवस आहे. तर रियाच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे (Rhea Chakraborty CBI inquiry). सीबीआयने पुन्हा रियाला चौकशीसाठी बोलावलंय. रिया आणि सिद्धार्थ पिठानी यांच्या माहितीत प्रचंड तफावत आहे. त्यामुळे समोरासमोर बसून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

LIVE Updates:

  • अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीची 5 तासापासून सीबीआय चौकशी, सिद्धार्थ पिठाणी, सॅम्युअल मिरांडाचीही चौकशी सुरु, सुशांतची बहिण मीतू सिंह आणि प्रियंकाला चौकशीसाठी समन्स, 8 ते 12 जून दरम्यान मीतू सिंह सुशांतसोबत असल्याने सीबीआय माहिती घेणार

सीबीआय अधिकाऱ्यांनी आपला तपास सिद्धार्थ पिठानी आणि रिया चक्रवर्तीवर केंद्रीत केला आहे. त्यामुळे तिसऱ्या राऊंडच्या चौकशीत अधिकाऱ्यांकडून मोठमोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ड्रग्सचा व्यवहार केल्याचा आरोप असलेला गौरव आर्या देखील गोव्यात सापडला आहे. त्याला याच प्रकरणी ईडीनं समन्स पाठवलं होतं. तो सोमवारी (31 ऑगस्ट) 11 वाजता ईडी ऑफिसला जाणार आहे. गौरव आर्या आज 3 च्या फ्लाईटने गोव्यातून मुंबईत परतणार आहे. दुपारी 4.30 वाजता तो मुंबईत लॅंड होईल.

ईडीने रियाच्या कथित चॅटवरुन तिचा गौरव आर्याशी जूनी ओळख असल्याचा दावा केला आहे. गौरव गोव्यातील वागाटेर येथे झालेल्या रेव पार्टीतील आरोपी आहे. गौरवसोबत बिग बॉस फेम ईझाज खान आणि इतर आणखी 19 जणांची चौकशी होणार आहे. जया शाह आणि श्रुती मोदीचीही सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे. रियाचे गौरवसोबत काय संबंध होते आणि त्याचा सुशांत आत्महत्येशी काही संबंध आहे का? गौरव आणि रियामध्ये ड्रग्ज संबंधित पैशांचा व्यवहार झालाय का? इत्यादी मुद्द्यांवर ईडीकडून तपास होणार आहे.

दरम्यान, आज रियाची सलग तिसऱ्या दिवशी सीबीआय चौकशी होत आहे. त्यासाठी ती सकाळी 6 पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे गेली. तिच्यासोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती देखील होता. सीबीआय चौकशीसाठी जाताना त्या दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव जाणवत होता.

संबंधित बातम्या :

कंगना ड्रग्जशी संबंधित नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार, सरकारकडून सुरक्षा का नाही? : राम कदम

सुशांत आणि रियाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल, पैशांच्या गुंतवणुकीबाबत चर्चा, बॉलिवूड सोडण्याबाबतही भाष्य

Sushant Case LIVE | ‘सुशांतला ड्रग्ज का आणि कुणाच्या सांगण्यावरुन दिले?’ सीबीआयकडून रियावर प्रश्नांची सरबत्ती

Rhea Chakraborty CBI inquiry

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.