सकाळी नऊ ते अकरा ठरली ‘घातवेळ’, पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले

पुण्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधित मृतांचा आकडा आता आठ झाला आहे. (Three COVID-19 patients die in Pune)

सकाळी नऊ ते अकरा ठरली 'घातवेळ', पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 4:17 PM

पुणे : पुण्यात आज सकाळच्या वेळेतच तिघा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ ते अकरा या दोन तासांच्या वेळेत हे तिन्ही रुग्ण दगावले. पुण्यात ‘कोरोना’मुळे बळी पडलेल्या नागरिकांची संख्या आठवर पोहोचली आहे. (Three COVID-19 patients die in Pune)

तिन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचे वय 60 वर्षांपुढील होते. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा आता आठ झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असं आवाहन पुन्हा केलं जात आहे.

आज दिवसभरात (7 एप्रिल) राज्यात 23 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 900 जवळ येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात 891 कोरोनाग्रस्त असून मृतांचा आकडा 55 वर गेला आहे. मुंबईत 526 तर पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 145 वर पोहोचली आहे.

हेही वाचा : Corona | नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पुणेकरांची चिंता वाढली

पुण्यात 5 एप्रिललाही 24 तासात तीन कोरोनाग्रस्त मृत्युमुखी पडले होते. ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या पुण्यातील त्या तिघांनीही परदेश प्रवास केलेला नव्हता. त्यामुळे स्थानिक संसर्गाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजच्या दिवसात झालेल्या तीन मृत्यूंचा तपशील अद्याप मिळालेला नाही.

पुण्यातील ‘त्या’ महिलेचा कोरोना रिपोर्ट मृत्यूनंतर पॉझिटिव्ह

पुण्यात 5 एप्रिलला मृत्यू झालेली 60 वर्षीय महिला आधी नायडू रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी ती ‘कोरोना’ निगेटिव्ह असल्याने तिला डिस्चार्ज दिला होता. मात्र घरी गेल्यानंतर इंक्युबेशन पिरेडमध्ये असताना अचानक तिची तब्येत ढासळली. ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं जात असताना तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर सॅम्पल चेक केले असता, ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.

Three COVID-19 patients die in Pune

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च 2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* 3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च 4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च 5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च 8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च 9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च 12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल 19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल 26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल 27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल 28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल 32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल 33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 40. मुंबई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल 42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 46. अंबरनाथ – एका रुग्णाचा मृत्यू – 6 एप्रिल 47. मुंबई – 41 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 48. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 49. मुंबई – 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 50. मुंबई – 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 51. मुंबई – 30 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू – 6 एप्रिल 52. मुंबई – 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 53. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 54. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 55. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांची ताजी आकडेवारी इथे पाहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

(Three COVID-19 patients die in Pune)

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.