चंद्रपुरात वाघिणीसह दोन बछड्यांच्या मृत्यूने खळबळ

चंद्रपूर येथे आज (8 जुलै) सकाळी तीन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चिमूर वनपरिक्षेत्रात मेटेपार गावातील नाल्याजवळ या वाघांचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरात वाघिणीसह दोन बछड्यांच्या मृत्यूने खळबळ
tiger carcass
| Edited By: | Updated on: Jul 08, 2019 | 12:10 PM

चंद्रपूर : चंद्रपूर येथे आज (8 जुलै) सकाळी तीन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चिमूर वनपरिक्षेत्रात मेटेपार गावातील नाल्याजवळ या वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक वाघीण असून इतर दोन बछडे आहेत. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

गावातील एकजण सकाळी गावालगत असलेल्या नाल्याजवळ जांभूळ काढायला गेला होता. यावेळी तिथे मृतावस्थेत तीन वाघ दिसले. त्यांनी तात्काळ वनविभाग आणि प्राणी मित्र अमोद गौरकरला या घटनेची माहिती दिली.

अमोद यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यामध्ये वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा अंदाज वर्तवला. वाघिणीच्या शेजारी एक चितळ मृतावस्थेत आढळून आले. या चितळाला खाल्ले असल्याने वाघांना विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेमुळे गावकरी आणि ब्रम्हपुरी वनविभागाचे डीएफओ कुलराज सिंह, चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.