टिकटॉक व्हिडीओ करणं महागात, पुण्यात बस चालक निलंबित

| Updated on: Jan 25, 2020 | 9:06 AM

टिकटॉकमुळे पुण्यातील बस चालक कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागली (Pune Bus driver suspend) आहे.

टिकटॉक व्हिडीओ करणं महागात, पुण्यात बस चालक निलंबित
Follow us on

पुणे : टिकटॉक हे अल्पावधीत प्रसिद्धीचे साधन बनले (Pune Bus driver suspend) आहे. शॉर्ट मेकिंग व्हिडीओ अॅप टिकटॉकचे भारतात मोठ्या प्रमाणात युजर्स आहेत. या अॅपवर अनेकजण आपले व्हिडीओ पोस्ट करुन प्रसिद्धी मिळवत असतात. तर काहीजण यातून रोजगारही मिळवतात. मात्र याच टिकटॉकमुळे पुण्यातील बस चालक कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागली (Pune Bus driver suspend) आहे.

पीएमपीच्या ई बसमधील चालक भीमराव गायकवाड यांनी टिकटॉक केल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. गायकवाड यांचा बसमधील टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बेकराईनगर डेपोत त्यांनी या टिकटॉकचा व्हिडीओ बनवला होता. याप्रकरणी पीएमपीएल प्रशासनाने गायकवाडला निलंबित केलं आहे.

@maheshgovardankarprem kont…hi…asho……♬ original sound – suchita vijay??

तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिपत्रक काढलं. प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून हे गंभीर आहे. यामुळे महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होत आहे. या प्रकरणी सर्व चालक-वाहक आणि खाजगी बसेस वरील सेवकांना बसमधील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल न करण्याची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर प्रवाशांना देखील बसमधील व्हिडीओ करण्यास प्रतिबंध करण्याची सूचना करण्यात आली (Pune Bus driver suspend) आहे.

@maheshgovardankarसिंगनल तोडनारा साठी♬ original sound – user481695

यानंतरही वाहक चालक आणि सेवक यांचे काही व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्याचे निदर्शनास आल्यास या सर्वांचे खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले (Pune Bus driver suspend) आहे.