लोणावळ्यात व्यापाऱ्यांची मुजोरी, पर्यटक कुटुंबाला अमानुष मारहाण

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

पुणे : पर्यटन नगरी म्हणून ओळख असणाऱ्या लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या गुजरात येथील पर्यटकांना टायगर पॉईंट याठिकाणी स्थानिक व्यावसायिकांनी जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. उंटस्वारीसाठी पैसे जास्त मगितल्याच्या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. या हाणामारीमध्ये जखमी झालेल्या सर्व जखमींना लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या हाणामारीत लाठ्याकाठ्यांचाही वापर करण्यात आलाय. हाणामारीत पाच […]

लोणावळ्यात व्यापाऱ्यांची मुजोरी, पर्यटक कुटुंबाला अमानुष मारहाण
Follow us on

पुणे : पर्यटन नगरी म्हणून ओळख असणाऱ्या लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या गुजरात येथील पर्यटकांना टायगर पॉईंट याठिकाणी स्थानिक व्यावसायिकांनी जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. उंटस्वारीसाठी पैसे जास्त मगितल्याच्या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. या हाणामारीमध्ये जखमी झालेल्या सर्व जखमींना लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

या हाणामारीत लाठ्याकाठ्यांचाही वापर करण्यात आलाय. हाणामारीत पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. पर्स हिसकावल्यामुळे 395 प्रमाणेही गुन्हा दाखल झालाय. लोणावळा पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली.

गुजरातचे मेमन कुटुंबीय लोणावळ्याला पर्यटनासाठी आले होते. टायगर पॉईंटवर उंट आणि घोडेस्वारी करण्याचं त्यांनी ठरवलं. मात्र उंटाच्या मालकासोबत पैशांवरुन मेमन कुटुंबीयांचा वाद झाला. जास्तीचे पैसे मागितल्यामुळे पर्यटकांसमोर भांडाफोड होईल, या भीतीने एकाने मेमन यांचा भाचा आसिफ मोतीवालाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. यानंतर मेमन कुटुंबीय आणि व्यापाऱ्यांमध्ये हाणामारी झाली.

व्यापारी आणि स्थानिकांनी काठी, पाईप आणि काचेच्या बाटल्यांनी मेमन कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे मारहाण करण्यात स्थानिक महिलाही सामील झाल्याचा दावा करण्यात येतोय. मेमन कुटुंबियांनी आपल्या 92 हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तूही गहाळ झाल्याची तक्रार केली आहे. या घटनेत आसिफ मोतीवाला यांच्यासह अहमद मेमन, सुफीयान मेमन, रईसा मेमन आणि नसर मेमन हे जखमी झाले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिस मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

पर्यटन व्यवसाय हा पर्यटकांवर अवलंबून आहे. लोणावळ्याला फक्त आसपासच्या शहरातूनच नाही, तर देशभरातले पर्यटक येतात. पण स्थानिकांच्या मुजेरीला पर्यटकांना सामोरं जावं लागत असेल तर लोणावळ्याकडे पर्यटक पाठ फिरवतील यात शंका नाही. त्यामुळे या मुजोर व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.