भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज 13 व्या दिवशी भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे पाकिस्तान आक्रमक झाला आहे. पाकिस्तानकडून सतत सीमेवर गोळीबार सुरु आहे. बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केल्यानंतर काश्मीरमध्ये शोपिया येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमद्ये चकमक सुरु आहे आणि भारताने आतापर्यंत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना मारले आहे. हे दहशतवादी शोपिया येथील रहिवासी वस्तीत लपलेले होते, अशी माहिती समोर आली आहे.

दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना समजली होती. दोन ते तीन दहशतवादी येथील एका घरात लपले होते आणि सतत गोळीबार करत होते. मात्र जवानांनी या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या येथील इंटरनेट सेवा बंद केली आहे. गोळीबार थांबला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

हे दोन्ही आरोपी जैश-ए-मोहम्मदच्या संघटनेचे होते. या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना सीआरपीएफ, भारतीय सैन्य आणि राज्य पोलिसांचा समावेश होता. त्यांनी आज सकाळी 4.20 वाजता एनकाऊंटर सुरुवात केली. सीमेवरील वाढता तणाव पाहता पुंछ आणि राजौरीमध्ये लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी) पासून 5 किमीपर्यंत असणाऱ्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI