पुण्यात कोरोना लक्षणांच्या दुर्लक्षाने शुक्रवारी एका तरुणाचा, तर सोमवारी एका महिलेचा मृत्यू

| Updated on: May 27, 2020 | 3:35 PM

पुण्यात कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने तीन दिवसात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona Patient death Pune) झाला आहे.

पुण्यात कोरोना लक्षणांच्या दुर्लक्षाने शुक्रवारी एका तरुणाचा, तर सोमवारी एका महिलेचा मृत्यू
Follow us on

पुणे : पुण्यात कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने तीन दिवसात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona Patient death Pune) झाला आहे. येरवडा परिसरातील तीस वर्षीय बाधित महिलेचा सोमवारी (25 मे) मृत्यू झाला, या महिलेचा रिपोर्ट काल (26 मे) पॉझिटिव्ह आला. तर 22 मे रोजी गुलटेकडी येथील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला (Corona Patient death Pune) आहे.

22 तारखेपासून या महिलेला ताप, खोकला, श्वसनास त्रास जाणवत होता. पण या महिलेने तीन दिवस या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं. त्रास वाढू लागल्याने 25 तारखेला महिलेला रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारा दरम्यान सोमवारी दुपारी एक वाजता केवळ आठ तासात या महिलेचा मृत्यू झाला.

कोरोनाबाधित मृत महिलेला कोरोनासोबत उच्च रक्तदाब आणि हायपोथायरॉईड आजार होते.

तर 22 तारखेला गुलटेकडीच्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने मृत्यू झाला होता. या तरुणाला 15 तारखेपासून कोरोना लक्षण आढळून येत होती. मात्र दुर्लक्ष केल्यानंतर 22 तारखेला रुग्णालयात दाखल केलं होते. सात दिवस त्याने दुर्लक्ष केलं आणि रुग्णालयात दाखल होताच अर्ध्यातासात या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

पुणे मनपाची कोरोना रोखण्यासाठी बैठक, बैठकीला 2 तास हजेरी लावलेल्या महिला अधिकाऱ्याच्या पतीला कोरोना

पिंपरी चिंचवड | कोरोना रुग्णसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर, कोणत्या प्रभागात किती?