जुगारींकडून पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

| Updated on: Aug 31, 2019 | 10:47 PM

जुगार खेळत असल्याच्या माहितीवरुन कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जुगारींकडून मारहाण करण्यात आली (Gamblers). जखमी पोलिसांवर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जुगारींकडून पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
Follow us on

वर्धा : सर्वत्र पोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना आर्वी पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे (Police constableS brutally beaten by gamblers). वडगाव पांडे या गावात ही घटना घडली. जुगार खेळत असल्याच्या माहितीवरुन कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जुगारींकडून मारहाण करण्यात आली (Gamblers). जखमी पोलिसांवर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर 15 ते 20 लोक जुगार खेळत असल्याचं या पोलिसांनी आढळलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी या जुगारींना हटकले असता लाठी-काठी, दगड, लाता-बुक्याने या पोलिसांन मारहाण करण्यात आली. या घटनेत मारोती सिडाम आणि मनिष राठोड हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी मारोती सिडाम यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना सहा टाके पडल्याची माहिती वैदकीय अधिकारी हेमंत पाटील यांनी दिली. तर मनिष राठोड हे किरकोळ जखमी झाले आहेत.

मारहाण कणाऱ्यांमध्ये 10 पेक्षा जास्त लोकांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी मारहाण करताना काहींनी व्हिडीओ देखील काढल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला असून नेमके कोण मारहाण करणारे आहेत, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र, प्रकरणी 20 ते 25 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करुन पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.

संबंधित बातम्या :

जालन्यातील मुलीवर चुनाभट्टीत गँगरेप, दीड महिन्यांपासून मुंबई पोलिसांना नराधम सापडेना

दारु पिताना किरकोळ वाद, तरुणाची हॉटेलमध्येच गळा चिरुन हत्या

मुंबईत अभिनेत्रीची आत्महत्या, आईसोबत वादानंतर टोकाचं पाऊल

मुलीच्या छेडछाडीला विरोध, कुटुंबातील 16 जणांवर अॅसिड हल्ला