मुंबईत अभिनेत्रीची आत्महत्या, आईसोबत वादानंतर टोकाचं पाऊल

मुंबईतील लोखंडवाला संकुलात राहणारी स्ट्रगलिंग अभिनेत्री पर्ल पंजाबी हिने राहत्या इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती आहे

मुंबईत अभिनेत्रीची आत्महत्या, आईसोबत वादानंतर टोकाचं पाऊल

मुंबई : मुंबईत एका उदयोन्मुख अभिनेत्रीने आत्महत्या (Mumbai Struggling Actress Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडवाला परिसरातील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या पर्ल पंजाबी (Pearl Punjabi) हिने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. आईसोबत झालेल्या वादानंतर पर्लने टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे.

पर्ल पंजाबी अंधेरीतील लोखंडवाला परिसरात असलेल्या केनवूड सोसायटीमध्ये राहत होती. पर्ल चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळवण्यासाठी धडपडत होती.

पर्लचे आपल्या आईसोबत फारसे चांगले संबंध नसल्याचं म्हटलं जात. याआधीही दोन वेळा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. गुरुवारी रात्रीही पर्लचा आपल्या आईसोबत वाद झाला. त्यानंतर रात्री 12.30 वाजता ती आपल्या राहत्या इमारतीच्या गच्चीवर गेली आणि तिथून तिने खाली उडी मारली.

पर्लने उडी मारल्याचं समजताच तिथल्या रहिवाशांनी तिला जवळच्या कोकिलबेन रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ओशिवारा पोलिस पुढील तपास करत आहेत.

यापूर्वीही, मनोरंजन विश्वात नशीब आजमावण्याचं स्वप्न उराशी बाळगून मायानगरी मुंबईत आलेल्या अभिनेत्रींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या आत्महत्यांना अनेक वेळा कौटुंबिक वादाची किनार होती. जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी, कुलजीत रंधावा, नफिसा जोसेफ, विवेका बाबाजी यासारख्या अनेक अभिनेत्रींनी आपलं आयुष्य संपवलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *